वर्षानंतर शेतकरी घरी परततोय जाताना सांगितले ‘पुन्हा येईन’

सलग ३७८ दिवस आपल्या हक्कासाठी दिल्लीच्या बॉर्डर वर बसलेले शेतकरी आज अखेर आपल्या घरी परतणार आहे, या आंदोलानाची इतिहास नोंद होईल यात काही शंका नाही. शेतकरी आंदोलकांनी आंदोलनात आपल्या मागण्या मान्य झाल्यावरच माघार घेतली आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या पाच सदस्य समितीची बैठक पार पडली त्यात शासनाने आपली भूमिका मांडली आणि येत्या १५ जानेवारी रोजी पुन्हा एक बैठक होणार आहे.त्यात काही बदल झाला किंवा मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करू अशी भूमिका संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

अखेर दिल्लीच्या सीमेवरचं शेतकरी आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. गेल्या तब्बल ३७८ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं.

१५ जानेवारीला पुन्हा शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. केंद्र सरकारच्या लेखी आश्‍वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केले आहे. सिंघू, गाजीपूर बॉर्डरवरून शेतकरी त्यांच्या घरी परतायला सुरुवात झाली आहे. हे आंदोलन स्थगित केल्यानंतर एमएसपीचा लढा सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या ३७८ दिवसांपासून देशाचा अन्नदाता बळीराजा दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. शेतकऱ्यांनी जी एकी आणि धीर दाखवला त्यापुढे केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे लागले.

“आम्ही आमचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही १५ जानेवारीला आढावा बैठक घेणार आहोत. जर सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही तर आम्ही आमचे आंदोलन पुन्हा सुरू करू शकतो.”
शेतकरी नेते गुरनाम सिंग चारुणी यांनी दिल्लीत संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीनंतर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *