राजकारण

आ.सुरेश धस याच्यावर १ हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप.

Share Now

बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी आष्टी तालुक्यातील इनामी जमिनी आपल्या नावे करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा गैर व्यवहार केले. माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.

आष्टी येथील देवस्थाने आणि मशिदीच्या इनाम जमिनींमध्ये सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आणि महसूल खात्याच्या आशीर्वादामुळे सुमारे १ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी केला आहे. धस यांनी विविध देवस्थानांच्या तब्बल ४५० एकर जमिनी लाटल्याचा आरोप आहे. तसेच जमिनीच्या व्यवहारात शासनाचा महसूल बुडवण्यात आल्याचाही आरोप आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते राम खाडे यांनी याबाबत प्रकाशित केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, खर्डा येथील विठोबा देवस्थान, आष्टीतील पिंपळेश्वर महादेव, मानूर येथील श्री विरुपाक्ष स्वामी गुरू, श्री गिरीस्वामी मठ, चिंचपूर दर्गा येथील जमिनींबाबत गैरव्यवहार करण्यात आला आहे. देवस्थानांच्या व मशिदींच्या इनामी जमिनी धस यांनी अल्पदरात विकत घेऊन त्याच्यावर प्लॉटिंग सुरु केले असेही या दोंघांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *