भ्रष्टाचार हा जगभराचा शिष्टाचार आपले तर विचारूच नका !
भ्रष्टाचार केवळ आपल्या देशाचा नाही तर संपूर्ण जगातील महत्वाचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस हा नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ९ डिसेंबरला साजरा केला जातो. कुठलंही काम कमी वेळेत किंवा अनधिकृत रित्या पूर्ण व्हावं यासाठी आपण तो मार्ग अवलंबत असतो त्यामूळे व्यवस्थेबरोबर आपणही तितकेच जवाबदार आहोत. भ्रष्टाचार हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीवर परिणाम कारक ठरत असतो. येणाऱ्या पिढीला भ्रष्टाचार काय असतो त्याविराधात होणारी कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी यासाठी हा दिवस तितकाच महत्वाचा आहे.
३१ ऑक्टोबर २००३ मध्ये यूएन महासभेने भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त राष्ट्राचे संमेलन स्वीकार केले होते. संयुक्त राष्ट्रमहासभेने तेव्हा ९ डिसेंबर हा दिवस भ्रष्टाचारविरोधी दिवस म्हणून सुरू केला होता. तर कॉन्वेश डिसेंबर २००५ मध्ये लागू झाले होते. संपूर्ण जागतिक समुदायाला संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) आणि UNODC भ्रष्टाचारविरोधीच्या प्रथांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अग्रणी आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र उभे राहून त्याचा विरोध केला पाहिजे.
आपल्या राज्यात महाराष्ट सध्या राजकीय नेते आणि काही अधिकारी भ्रष्टाचार केल्याच्या आरोपात चर्चेत आहेत.
गेल्या एक वर्षात माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग चर्चेत आहेत.