जनरल बिपीन रावत यांचं निधन.

संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कुन्नुरजवळ क्रॅश !
संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा कुन्नूर (तामिळनाडू) मध्ये अपघात झाला. कुनुर भागात हेलिकॉप्टर क्रॅश झाले. एमआय- १७ व्ही ५ या हेलिकॉप्टर मधून रावत प्रवास करत होते. १४ जण या हेलिकॉप्टर मधून प्रवास करत होते.
या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.
जनरल रावत हे एक जानेवारी २०२० मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत लवकरच यासंबंधी माहिती देणार असल्याचं समजतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *