ज्ञानपीठ पुरस्कार : कोकणला बहुमान दामोदर मावझो यांचे नाव घोषित

ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी अनुक्रमे ५६ आणि ५७ व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा केली. २०२१ साठी आसामी साहित्यिक नीलमणी फुकन यांना तर २०२२ साठी कोकणी साहित्यिक दामोदर मावझो यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

प्रसिद्ध कोकणी लेखक दामोदर मावझो हे गोव्यातील कादंबरीकार, कथा लेखक, समीक्षक आणि निबंधकार आहेत. ७७ वर्षांचे मावजो यांचा जन्म १९४४ ला दक्षिण गोव्यातील माजोर्डा मध्ये झाला . शाळेत ते गोव्यातच गेले तर पदवी शिक्षण मात्र त्यांनी मुंबईत पूर्ण केलं. दामोदर मावझो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोकणातील दुसरे साहित्यिक आहेत. त्या आधी रविंद्र केळकर यांना हा पुरस्कार मिळाला आहे. कार्मेलिन या कादंबरीसाठी त्यांना १९८३ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार (कोंकणी) मिळाला आहे. दामोदर मावझो यांचा जन्म १ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. आतापर्यंत त्यांचे ४ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्ञानपीठ हा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तो भारतातील अनुसूची यादीत असलेल्या सर्व भाषांमधील लेखनासाठी दिला जातो.सगळ्या गोमंतकांसाठी ही एक अभिमानास्पद बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *