हे भारतीय ठेवणार चंद्रावर पाऊल !
आज पर्यंत कोणत्याही भारतीयाने चंद्रावर पाऊल ठेवला नसला तरी लवकरच भारतीय वंशाचे अनिल मेनन चंद्रावर पाऊल ठेवणर आहेत. पण कोण आहेत अनिल मेनन?
यूएस स्पेस एजन्सी नासाने आपल्या चंद्र मोहिमेसाठी 10 प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली आहे. यामध्ये भारतीय वंशाचे डॉ.अनिल मेनन यांचा समावेश आहे. या मिशनसाठी निवडलेल्या 10 लोकांपैकी 6 पुरुष आणि 4 महिला आहेत. 50 वर्षांनंतर मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या प्रकल्पावर नासा काम करत आहे. आतापर्यंत भारतातील 4 लोक अंतराळात गेले.त्यापैकी राकेश शर्मा हे पहिले अंतराळवीर होते. त्यांच्याशिवाय भारतीय वंशाच्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स आणि राजा चारी अवकाशात गेलेले आहेत. अनिल जर नासाच्या चंद्र मोहिमेचा भाग बनले तर ते चंद्रावर जाणारे पहिले भारतीय वंशाचा व्यक्ती ठरतील.
भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा जन्म युक्रेनमध्ये झाला. ते यूएस एअर फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल म्हणून तैनात आहेत. NASA च्या SpaceX Demo-
2 मोहिमेदरम्यान वैद्यकीय संस्था तयार करणारे ते पहिले SpaceX फ्लाइट सर्जन होते. डॉ मेनन यांना आधीच NASA मध्ये फ्लाइट सर्जन म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. अनिल मेनन, 45, हे इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन आहेत.