आंदोलनाची वर्ष पूर्ती हर्ष घेऊन येणार का ?
दिल्लीच्या सीमेवर एका वर्षापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे, एका वर्षानंतर शेतकरी आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय झालं असून आता या शेतकरी आंदोलनाचा आज समारोप होण्याची शक्यता आहे, आज किसान मोर्चाच्या पाच सदस्याच्या समितीसोबत अमित शहा चर्चा करणार आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील तुम्ही आंदोलन मागे घ्यायला हवं असं शासनाच्या वतीने आंदोलन करणाऱ्या शेतकार्यना सांगितलं जातं आहे.
केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले तरी शेतकरी आंदोलनच्या दरम्यान ज्या शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे.
शेती मालाला हमीभाव मिळावा यासाठी लवकरात लवकर निर्णय घायला हवा.
आंदोलनात ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यानी जीव गमावलं आहे, त्यांना पंजाब राज्य सरकाने पाच लाख रुपय रोख आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे, मात्र केंद्र सरकारने देखील मृतांच्या कुटुंबाला मदत करायला हवी अश्या मागण्यांवर सद्या केंद्र सरकार सोबत चर्चा चालू आहे , जेव्हा केंद्रसरकार कडून उत्तर मिळाले नाही ते आल्यावरच आम्ही माघार घेणार असे शेतकरी आंदोलक चे म्हणणे आहे.
आज होणाऱ्या चर्चेत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, आज या मागण्या पूर्ण झाल्या तर एक ऐतिहासिक आंदोलनाचा हा विजय असेल.