आज महापरिनिर्वाण दिन…

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी योगदान दिले, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची आहेच, भारत स्वतंत्र तर झाला परंतु त्यापुढे जातीय असमानता कायम होती, प्रत्येक माणसाला व्यक्ती स्वतंत्र आणि लोकशाही प्रदान देश चालावा यासाठी त्यानी दिलेलं संविधान, यावर आपण आज लोकशाही प्रदान देशात आहोत. आज अश्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिन..!
आज महापरिनिर्वाण दिन, आज रोजी म्हणजे ६ डिसेंबर १९५७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यांचं निधन दिल्ली येथे झालं. दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौध्द पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. नंतर काही वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र चैत्यभूमी हे मुंबईच्या दादर भागात असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळी आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांना लोक ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
दलित वंचित घटकातील लोकांसाठी त्यांनी लढा दिला परंतु केवळ त्यांचा नेता अश्या दृष्टीने विचार करणं मात्र चुकीचं आहे. त्यांनी ज्या पदावर काम केलं आहे त्याचा समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ व्हावा या अनुषंगाने त्यांनी काम केलं.
बाबासाहेबांचं औरंगाबाद मराठवाड्यावर नितांत प्रेम होतं, औरंगाबाद शहरातील मिलिंद महाविद्यालयात आजही गेलं तर याची प्रचिती तुम्हाला बघायला मिळू शकते. १९५० मध्ये मिलिंद महाविद्यालयांची स्थापना  केली यामुळे शिक्षणची क्रांती घडवून आणण्याच काम त्यांनी केलं आहे.
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करतात.अश्या या महामानवास विनम्र अभिवादन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *