टीकेचे धनी कुबेर, शाईफेक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर

लोकसत्ता या वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांची लेखणी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असते , गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी लिहलेल पुस्तक रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र यात काही वादग्रस्त मजकूर आहे, त्यामुळे या पुस्तकावर बंदी आणावी किंवा वादग्रस्त मजकूर वगळून पुस्तक प्रकाशित करावं, अशी मागणी अनेक राजकीय पक्ष आणि राजकीय संघटनांकडून होत होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील लेखी पत्र देण्यात आलं आहे, मात्र याची दखल घेतली जात नव्हती यामुळेच कदाचित हा प्रकार घडला असावा.

नाशिक येथे साहित्य संमेलनाच्या एका सत्रात गिरीश कुबेर आले होते, त्यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. आणि साहित्य संमेलनाला अखेर गालबोट लागलं. गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणानंतर देखील गिरीश कुबेर यांनी संमेलन सोडलं नाही, त्यांनी सत्रात उपस्थिती लावली. आणि सद्यस्थितीत माध्यम करत असलेल्या कामावर आपलं मत व्यक्त केलं. समाजाच अवैचारीकरण आणि वैचारिकतेचा अभाव असेल तर माध्यमाची जवाबदारी असते समाजाला वैचारिकतेकडे आणण्याची.
समाज एक दिशेला जात असेल तर माध्यमांने दुसरी दिशा दाखवायला हवी, मात्र आता समाजाच्या दिशेने माध्यम जात आहेत. हा माध्यमाचा पराभव म्हणावा लागेल. लोकांना चांगले वाचायला आवडत नाही, अशी भूमिका माध्यमाची असेन तर माध्यमांनी स्वतः स्वतःचा पराभव स्वीकारला आहे.
प्रत्येक महत्वाच्या घटनेला आकार देण्याच किंवा प्रत्येक घटना घडण्याची प्रेरणा किंवा उद्देश माध्यमाने केला आहे. हा माध्यमाचा इतिहास आहे.
प्रत्येकाची भूमिका समाज मान्य करेल अशी नाही, तुम्ही प्रत्येकाला सुखी करू शकत नाही, यावर गिरीश कुबेर यांनी स्टीव्ह जॉब्स याचं एक वाक्य सांगितलं आहे, तुम्ही सर्वांना आनंदी करू इच्छित असाल तर आईस्क्रीमचं दुकान टाकायला हवं, सगळे आनंदी येतील आणि जातील. वाचकाला किती गोड किंवा कडू वाटतंय याचा विचार न करता माध्यमांना बुद्धीचा आधार देऊन चालवायला हवं.
लोकांस काय वाटे याचा विचार संपादकाने करू नये, लोकांमुळे लिखाण करत असाल तर चुक आहे. आगरकरांनी सुधारक काढलं होत त्यातील नियतकालिके च्या निबंध होता त्यातील वाक्य असल्याचे गिरीश कुबेर यांनी सांगितले.

नेमकं काय लिहल आहे गिरीश कुबेर यांनी :-
१) छत्रपती संभाजी महाराजांकडे शिवाजी महाराजांप्रमाणे सहनशीलता आणि परराष्ट्र धोरण नव्हते. शिवाजी महाराजाच्या सैन्याने प्रजेवर कधीही अत्याचार केले नाहीत पण संभाजी महाराजाच्या सैन्याने केले.
२) शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गादीवर येण्यासाठी संभाजीने रक्तपात घडवला. संभाजीने सोयराबाई आणि शिवाजी महाराजांच्या हयातीत तयार झालेल्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री ठार केले. या चुकांमुळे स्वराज्यातील कर्तबगार मंडळी नाहीशी झाली आणि याची शिक्षा त्याला पुढे भोगावी लागली.
३) सत्ता काबीज करण्यासाठी संभाजी महाराजांनी महाराणी सोयराबाई यांना ठार केलं’
४) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर बाजीराव पेशवे आहेत.

गिरीश कुबेर यांनी १६ डिसेंबर २०१४ रोजी रसिक मध्ये बळीराजाची बोगस बोंब हा अग्रलेख लिहला होता. त्यावेळी देखील त्यांच्यावर सर्व स्तरावरून टीका झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *