राज्य – स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय नाही? शाळा सुरू कारण्याबती तारीख पे तारीख.
राज्य शासनाने शाळा सुरू करण्याची परवानगी दिली तरी राज्यातील मुख्य शहरातील स्थानिक प्रशासनाने मात्र मनपा हद्दीतील शाळा सुरू करण्याची तारीख वाढवली आहे. ग्रामीण भागातील शाळा आजपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तब्बल दीड वर्षानंतर ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. मात्र तिसऱ्या लाटेची भीती पालकांच्या मनात कायम असल्याचे देखील दिसून आले.
औरंगाबाद शहरातील पहिली ते सातवीच्या वर्ग १० डिसेंबरनंतर सुरू करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी घेतला आहे, कोरोनाची पुढील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल अन्यथा विध्यार्थांसाठी ऑनलाइन शिक्षण हा पर्याय कायम असेल.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुणे या शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपासून सुरू होतील. कोरोनाचा नवा व्हेरियन्ट आला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे, असे शिक्षण अधिकारी यांनी सांगितले. नाशिक आणि नागपूर शहरातील पहिली ते सातवी वर्ग १० डिसेंबरनंतर चालू होतील.
गेल्या दीड वर्षा पासून संपूर्ण जगावरच कोरोनाचे संकट होत, यात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, सध्या कोरोना रुग्णाची रुग्ण संख्या कुठं कमी व्हायला लागली आणि शासनाने राज्यातील सर्व आस्थापने सुरू आहेत. शहरातील पहिली ते सातवीपर्यंत शाळा मात्र अजूनही बंद आहेत. टास्क फोर्सने शाळा सुरू करण्यास हीच हरकत नसल्याचे सांगितले तरी देखील स्थानिक प्रशासन मात्र शाळा सुरू करण्याची नवी तारीख दिली आहे, यावर मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे, कारण सार्वजनिक आरोग्य विभाग, शिक्षण मांत्रालय यांच्याकडून परवानगी असेल आणि स्थानिक प्रशासन नवीन तारीख देत असेन तर यांच्यात समन्वय नाही का असे असे प्रश्न उपस्थित राहतो.