कॉ. मनोहर टाकसाळ यांना अखेरचा लाल सलाम.
कॉ. मनोहर टाकसाळ यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मनोहर पंढरीनाथ टाकसाळ हे ९३ वर्षाचे होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते असलेल्या टाकसाळ यांनी लालबवटा शेतकरी मजूर युनियनचे अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले आहे.
कॉ. मनोहर टाकसाळ यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी असले तरी त्याच पूर्ण आयुष्य औरंगाबाद मध्ये गेलं. शिक्षण प्रचार आणि संघटना वाढीसाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं. १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद राहिले आहे. जिल्हा सचिव ते राष्ट्रीय कौन्सिल अशा विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. औरंगाबाद येथील दलित समाजाच्या अत्याचार विरोधी समितीच्या स्थापनेपासून त्यांनी अध्यक्षपदी काम केलं आहे.
शेतकरी , शेत मजूर आणि कामगारांसाठी त्यांनी अनेक आंदोलने करून त्यांचे प्रश्न शासनाच्या दरबारी मांडण्याच काम त्यांनी केलं आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या लढ्यात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षच्या वतीने त्यांनी रशियातील मास्को येथे अभ्यासासाठी गेले होते. त्याचा पश्चात पत्नी , मुलगी आणि त्यांचा मुलगा भारतीय कामगार पक्षाचे सहसचिव ऍड. कॉ. अभय टाकसाळ आणि एक मुलगा इंजिनिअर अजय टाकसाळ आहेत.