अग्रदूत लोककलावंत कामगार मेळावा उद्या होणार.
दुर्लक्षित होत चाललेल्या लोककलांचे संवर्धन, मराठवाड्यातील असंघटित लोककलावंत व कामगाराचे संघटन, त्यांच्या समस्या आणि सकारात्मक निराकरण करण्यासाठी मराठवाडास्तरीय अग्रदूत लोककलावंत कामगार मेळावा आयोजित केला आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चा अंतर्गतचित्रपट कामगार आघाडीने मेळाव्याचे आयोजक असून ३ सप्टेंबर ला पत्रकार परिषद घेण्यात आली … मराठवाड्यातील लोककलाकारांची नोंदणी आणि त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती,पत्रकार परिषदेत देण्यात आली.
वीज ग्राहकांसाठी अभय योजना,होतील हे फायदे…
यावेळी भारतीय कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, चित्रपट आघाडीचे प्रदेश अध्यक्षसमीर दीक्षित, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन अनर्थे, सरचिटणीस राकेश ठाकूर, शाहीर अजिंक्य लिंगायतउपस्थित होते.
५ सप्टेंबरला रुक्मिणी सभागृह, एमजीएमयेथे दुपारी १ वाजता मराठवाडास्तरीय अग्रदूत लोककलावंत कामगार मेळावा आयोजित केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन होईल. दिग्दर्शक, चित्रपट निर्माते एन. चंद्रा, ज्येष्ठ अभिनेतेविजय पाटकर, दिग्दर्शक अजित परब, ज्येष्ठ शाहीर व समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तअंबादास तावरे, ज्येष्ठ अभिनेत्रीकिशोरी शहाणे व अभिनेत्री सुरभी हांडे यांच्या उपस्थितीत चर्चासत्र, मेळावा आणि ११ ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार होईल.
Latest:
- ‘सोलर कुंपणा’मुळे पिकांचे उत्पादन वाढले, वन्य प्राण्यांच्या दहशतीतूनही दिलासा मिळाला
- कोंबडीपेक्षा या पक्ष्याच्या संगोपनातून अधिक उत्पन्न मिळते, मांस, अंडीही चढ्या भावाने विकली जातात, कमी खर्चात व्यवसाय सुरू करा.
- सोयाबीनचा भाव: सोयाबीनच्या दरात किंचित वाढ, तरीही बाजारभाव एमएसपीवर पोहोचला नाही
- पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबरमध्ये जारी होणार, तुमची ई-केवायसी त्वरित याप्रमाणे करा