महाराष्ट्र

प्रा. वामन केंद्रे राष्ट्रीय कालिदास पुरस्काराने सन्मानित

Share Now

राष्ट्रीय कालिदास सन्मान हा पुरस्कार मध्य प्रदेशच्या सरकार कडून देण्यात येतो. याची स्थापना १९८० मध्ये करण्यात आली होती. यंदा हा पुरस्कार रंगभूमीवरील योगदानासाठी प्राध्यापक वामन केंद्रे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा सन्मान असून दोन लाख रुपये रोख आणि मंच सन्मान असं या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. भोपाळ येथे या पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली होती.

भारतीय नाटकांना देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्यासाठी प्रा. वामन केंद्रे यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत.
ते महाराष्ट्रातील एक विख्यात नाट्य दिग्दर्शक, नाट्य अभ्यासक, नाट्य प्रशिक्षक होते. ते मूळचे बीड येथील दरडगाव येथील होते. त्यांचे वडील भारूडकार होते. त्यांनी त्यांचं शिक्षण बीड, औरंगाबाद आणि नाट्यशास्त्राच्या उच्च शिक्षणासाठी नवी दिल्ली येथे जाऊन पदव्यूत्तर पदवी घेतली. त्यानंतर मुंबईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून सुमारे नऊ वर्षे काम केले. यादरम्यान त्यांनी नाट्यदिग्दर्शन देखील सुरू केले. त्यांनी अनेक नाटकं भारताच्या विविध भागात एका उंच शिखरापर्यंत नेऊन ठेवली. आदिवासी, लोककलावंत, हौशी, व्यावसायिक, शास्त्रीय त्याचबरोबर वंचित कलाकारांना योग्य प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम राबवले. प्रा. वामन केंद्रे यांना आतापर्यंत 5 राष्ट्रीय सन्मान पुरस्कार मिळाले आहे.

प्रा. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेली नाटके

त्यांनी बरेच नाटकं दिग्दर्शित केले आहे. त्यामधील प्र.के अत्रे यांनी लिहिलेले अशी बायको हवी, पु. ल. देशपांडे लिखित एक झुंज वाऱ्याशी, रत्नाकर मतकरी लिखित चार दिवस प्रेमाचे, जानेमन, उत्तम बंडू तुपे लिखित झुलवा, जयवंत दळवी लिखित नातीगोती, भासकवी,मराठी नाट्यलेखन वामन केंद्रे लिखित पिया बावरी, प्रेमपत्र, मोहनदास, पु. ल. लिखित ती फुलराणी, विश्राम बेडेकर लिखित रनांगण, शफाअतखान लिखित राहिले दूर घर माझे, सोफोक्लिज, मराठी रूपांतर मच्छिंद्र मोरे लिखित वेधपश्य ही नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आहेत.

२००४ मध्ये त्यांना मनोहर सिंग स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २०१२ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार,२०१७ मध्ये बी. व्ही. कारंत स्मृती पुरस्कार, २०१९ मध्ये पद्मश्री या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आता या पाचव्या पुरस्काराने म्हणजेच राष्ट्रीय कालिदास सन्मान पुरस्काराने चार चांद लावले असं म्हणायला हरकत नाही.

२०१८ मध्ये हा राष्ट्रीय कालिदास पुरस्कार एंजली एला मेनन यांना मिळाला होता. शंभु मित्रा, इब्राहिम अल्काजी, हबीब तणवीर, बादल सरकार, ब.व कारंत, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, गिरीश कर्नाड, कावालम नारायण पन्नीकर, जोहरा सहगल, बाबासाहेब पुरंदरे, विजया मेहेता, सत्यदेव दुबे, तापस सेन, रतन थियाम, बंशी कोल, अनुपम खैर, राज बिसारिया, राम गोपाल बजाज, देवेंद्रराज अंकुर, यांना आतापर्यंत राष्ट्रीय कालिदास सन्मान पुरस्कार देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *