सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांची एसटी कर्मचारी संपातून माघार..!
पंधरा दिवसापासून मुंबई येथील आझाद मैदानावर एसटी कामगारांचा आंदोलन सूर आहे , राज्य शासनाकडून अनिल परब यांनी वारंवार सांगूनही संप काही संपत नव्हता, भाजपचे आ.गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाला पाठींबा दिला होता. त्यांनी एसटी कामगारांच्या वतीने शासनासोबत वारंवार चर्चा देखील केली. एसटी कामगारांचे शासनात विलीनीकरण व्हायला हवं हा प्रश्न सोडला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात राज्य शासनाने ४१ टक्के मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय काल झाला आहे. यावेळी पत्रकार परिषद देखील झाली होती, या पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर उपस्थित होते त्यांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यासोबत चर्चा करून पुढची आंदोलनाची बाजू मांडू असे सांगितले होते, मात्र एसटी कामगार विलीनीकरनाच्या प्रश्नावर संप कायम ठेवणार का.. ? हा प्रश्न कायम आहे .
आज सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनातुन माघार घेतली आहे, त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही कामगारांना आझाद मैदानावर आणलं होतं, आंदोलनातील पहिल्या टप्पा यशस्वी झाला आहे, शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली , परंतु विलीनीकरण व्हावं हा प्रश्न अजून कायम आहे. हा निर्णय उच्च न्यायालयात आहे त्यामुळे सरकारच्या वतीने जे शक्य होत ते मिळवलं आहे.
या आंदोलनातून आम्ही माघार घेत आहे, आंदोलनाची पुढची दिशा एसटी कामगारांनी ठरवावी संप मागे घ्यायचा की चालू ठेवायचा.
एसटी कर्मचाऱ्याच्या संपात आता गटबाजी उघडपणे दिसून येत आहे , आजपर्यंतची परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यासाठी सर्वात मोठी वेतन वाढ आहे.