पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली तरी शेतकरी आंदोलन मागे घेणार नाही.- राजेश टीकैत
एक वर्षांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत, केंद्र सरकारने तीन कृषी कायदे केले होते, यासाठी काही शेतकरी संघटनेचा पाठिंबा होता परंतु काही शेतकऱ्यांना याला विरोध केला, याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश असे देशभरातील शेतकरी ज्यांना ज्यांना या कायद्यात विरोध दर्शविला त्यांचं आंदोलन एक वर्ष चालू होतं.
आज सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून मोठी घोषणा केली, आज गुरुनानक जयंती आणि देव दिवाळी देखील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यांनी आजच्या भाषणात त्यांनी आज २०१४ पासून देशातील शेतकऱ्यांसाठी कश्या प्रकारे काम केलंय त्याची संपूर्ण माहिती आकडेवारी सहित मांडली.
या शेतकरी आंदोलची नेतृत्व एका वर्षांपासून सांभाळणारे राजेश टिकैत शेतकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली,
जोपर्यंत संसदेत हा कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.