देश

शेतकरी लढला आणि जिंकला देखील – केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द केले.

Share Now

दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलकांना यश. आज गुरुनानक जयंती आणि देव दिवाळीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले . आज सकाळी नरेंद्र मोदी काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या दोन वर्षपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश अश्या अनेक राज्यातील शेतकरी आंदोलन करत होते. यावर केंद्र सरकारने आज ठोस भूमिका घेऊन कायदे रद्द करण्याची भूमिका घेतली आहे.
काय बोलले मोदी जश्याच तसे .
आज देव दीपावलीचा पवित्र दिवस आहे, त्याचबरोबर गुरुनानक जयंती देखील आहे, देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या.
दीड वर्षानंतर करतारपूर कॉरिडॉर साहेब उघडलं आहे.

“संसार मे सेवा का मार्ग आपणांनसे ही जीवन सफल होता है
हमारी सरकार ऐशी सेवा भाव के साथ काम कर राही है।”
माझ्या पाच दशकातील जीवनात मी शेतकऱ्यांना खूप जवळून पाहिलं आहे, मला देशातील जनतेने २०१४ मध्ये पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी दिली. आम्ही कृषी विकास आणि शेतकरी कल्याणाला प्रथम प्राधान्य दिलं.
देशात १०० मधून ८० शेतकरी अल्पभूधारक आहेत, अश्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या संख्या १० कोटी पेक्षा जास्त आहे परंतु कमी नाही.
तितक्याच शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह असतो देशातील लहान अल्पभूधारक शेतकरी बांधवाच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,
आम्ही शेतकऱ्यांना २२ कोटी हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिले. पीक विमा योजनेला अधिक प्रभावी बनवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जोडण्याचा आमचा मानस आहे. देशातील शेतकरी बांधवाना चार वर्षात एक लाख कोटी पेक्षा जास्त मदत दिली आहे.
अल्पभूधारक शेतकरी आणि त्यासाठी काम करण्याऱ्यांना आम्ही मदत केली आहे, कुठल्याही योजनेची रक्कम त्याच्या बँक खात्यात १ लाख ६२ हजार कोटी सरळ दिले तसेच आम्ही MSP वाढवली आणि सरकारी खरेदी केंद्र देखील बनवलं आहे.
– १००० पेक्षा जास्त मंडी ई – नाम योजनेला जोडून माल विक्री करण्याची संधी दिली. केंद्र सरकारने कृषी बजेट पाच पटीने वाढवल आहे, १२५ लाख कोटी कृषिवर केंद्र शासनाचा खर्च होत आहेत. लहान शेतकऱ्यांची ताकत वाढवण्यासाठी १० हजार MPO यावर ७००० कोटी खर्च करत आहोत.मायक्रो इरिगेशन फंड वाढवून १०००० कोटी केला आहे. यामुळे क्रॉप लोनची क्षणात दुप्पट केली असून यावर्षी १६ लाख कोटी होईक. पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय करण्यास इच्छुकांना किसान क्रेडिट कार्ड देणार आहोत.
शेतकऱ्यांसाठी आम्ही प्रामाणिकपणे कांम करत आहोत, तीन कृषी कायद्याच्या बाबतीत शेतकरी संघटनानी समर्थन केले, त्यावर अनेक शेतकरी संघटनेशी सखोल चर्चा देखील झाली.
नवीन कृषी कायदे केले यावर सर्व शेतकरी वर्गाचा विराध नव्हताच काही लोकांनी याला विराधात भूमिका घेतली त्यांना आम्ही समजावून सांगण्यास आम्ही कुठेतरी कमी पडलो आहोत. आम्ही त्या शेतकरी आंदोलकांसोबत व्यक्तिगत आणि सामूहिक चर्चा केली त्याच मत आणि भूमिका जाणून घेतली त्यात कुठल्याही प्रकारची काटकसर केलेली नाही.
कायद्यातील ज्या नियमाचा त्रास होता त्यावर सरकार ते कायदे बदलायला तयार होती यामुळे दोन वर्षे आम्ही हे कायदे निलंबित करण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला या सगळ्या गोष्टी देशवासियांसमोर आहे.
मी आज देशातल्या नागरिकांची क्षमा मागून निर्मल मनाने सांगू इच्छितो की, आमच्यात काही कमी राहिली असेल ज्यामुळे दिव्याच्या प्रकाश प्रमाणे सत्य आम्ही काही शेतकरी बांधवाना समजावून सांगू शकलो नाही.
आज गुरुनानक जयंती एक पवित्र दिवस आहे, आजचा दिवस कुणालाही दोष देण्याचा नाही. याच पवित्र दिवशी आम्ही तिन्ही कृषी कायदे वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात संसदीय अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कृषी कायदे मागे घेणार आहोत.
मी आज आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवाना विनंती करत आहे, आज गुरू परब यांचा पवित्र दिवस आहे, तुम्ही घरी जाऊन एक नवीन सुरवात करायला हवी.
केंद्र सरकार भविष्यात क्रॉप MSP आणखी प्रभावी आणि पारदर्शक करण्यासाठी एक समिती गठीत करणार आहे त्यात केंद्र सरकार, राज्य सरकार, शेतकरी अभ्यासक आणि कृषी अर्थतज्ञ असतील.
आज नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना संबोधित करताना भाषणाच्या शेवटी गुरू गोविंदसिंग यांच्या भावनेतून सांगता केली, मी शुभ कर्म करण्यापासून मागे हटणार नाही, मी शेतकरी बांधवांच्या हिताचे निर्णय घेतले. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी मेहनत करण्यास कुठलीही काटकसर ठेवली नाही, आणखी जास्त मेहनत घेऊन तुमच्या सर्वांचे आणि देशाचे स्वप्न भविष्यात पूर्ण व्हावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *