देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. – खा. शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा चार दिवस विदर्भ दौरा आहे त्यांनी काल नागपूर येथे त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी सभेत केंद्र सरकारवर त्यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली, तसेच केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारभारावर ताशेरे ओढले, हे सरकार वाढत्या महागाईच्या विषयावर मूग गिळून बसलंय पेट्रोल डिझेल खाद्यतेल याचे भाव गगनाला भिडले आहेत अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यामुळे काही लोकांना सहन होत नसून सामान्य लोकांच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा राज्यात कुणाची चौकशी करावी याची नाव सांगण्याच काम करत आहेत, नाव न घेता त्यांनी देवेंद्र फडणवीस याचे कांम पिळले.
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाले, त्यानंतर माझ्याकडे आले आणि दोष लागल्यामुळे मी सत्तेत बसणार नाही हा निर्णय घेतला आणि त्यांनी राजीनामा दिला. हे कशामुळे घडले तर एका माजी आयुक्तांमुळे घडले. आता हे आयुक्त आहेत कुठे? तुम्हाला तोंड दाखवायची ज्यांची तयारी नाही असे अधिकारी बाहेर आहेत आणि अनिल देशमुख आत आहेत. केंद्र सरकार एखाद्या राज्यात सत्ता मिळाली नाही की सत्तेचा गैरवापर करून त्या राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.
श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक सरकार उभे करण्यात आपल्याला यश मिळाले.या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा महत्त्वाचा सहभाग आहे. राज्याला स्थिर कारभार देऊन प्रगतीच्या मार्गाकडे न्यायचा निर्णय आम्ही घेतला. पण काही लोकांना हे पटत नाही. काहींच्या हातून सत्ता गेल्याने त्यांच्यात एक अस्वस्थता निर्माण झाली.
देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे.. सत्तेचा वापर सन्मानाने करायचाअसतो, सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं.
सध्या तेल, पेट्रोल, गॅसच्या गगनाला भिडल्या आहेत. गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टींचा आदर करण्याची भूमिका या केंद्र सरकारची नाही. गेल्या एक वर्ष झालं दिल्लीच्या सीमेवर शेतकरी त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करत आहेत, त्या शेतकरी बांधवांसोबत चर्चा मानसिकता यांची नाही.
अश्या परखड शब्दात त्यांनी आपले मत मांडले जवळपास दोन वर्षानंतर विदर्भ दौऱ्यावर गेले आहेत..