औरंगाबाद पर्यटनाला चालना; विमानसेवा वाढण्याची गरज

औरंगाबाद विभागात पर्यटन वाढताना दिसत आहे. कोव्हिड लाॅकडाऊन नंतर आता काही प्रमाणात पर्यटक वाढताना दिसत असले तरी अद्याप पुरेशी विमान कनेक्टीव्हिटी नसल्याने पर्यटक इनकमिंग नाही. तरीही गेल्या महिन्यात लाखावर पर्यटकांनी औरंगाबाद परिसरातील स्थळांना भेटी दिल्या आहेत.
पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेलं औरंगाबाद शहर आता पर्यटणासाठी सज्ज झालेलं आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आले होते. बाजारपेठ, शाळा महाविद्यालयांपासून ते पर्यटन स्थळापर्यंत सर्व काही बंद होते. परंतु आता सर्व परिस्थिती पहिल्यासारखी झाल्याचं दिसत आहे. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटनप्रेमींची संख्याही आता वाढत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचे भान ठेऊन, सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर आणि अति महत्वाचे म्हणजे, कोरोना वॅक्सीनचे डोस झाले असेल तरच सर्व ठिकाणी पर्यटकांना एन्ट्री देण्यात येत आहे.

औरंगाबाद येथील आणि मराठवाड्यातील एकमेव महापालिकेचे उद्यान म्हणून ओळख असलेलं सिद्धार्थ उद्यान आणि प्रणिसंग्रहालय आता तब्बल 19 महिन्यानंतर सुरु करण्यात आलेलं आहे. हे उद्यान फक्त लहान मुलांचं आकर्षण नसून जेष्ठ व्यक्तींना देखील या उद्यानाच आकर्षण आहे. या ठिकाणी असलेल्या प्राणीसंग्रहालयात १४ वाघ, बिबट्या, तरस, निलगाय, हरीण, मगर, शहामृग आणि माकड असून खेळणी आणि वेगवेगळ्या पुतळ्यांनी मुलं आकर्षित होत आहे. महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी परिपत्रक काढून १२ नोव्हेंबर पासून उद्यान दोन्ही डोस पूर्ण असलेल्यांसाठी आणि बालकांसाठी सुरु केल आहे. त्यामुळे बालकांसह मोठ्यांमध्येही उत्साह दिसत आहे.

कोरोनाचे दोन्ही डोस न घेतलेल्याना औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांमध्ये प्रवेश देण्यात येणार नसून, स्मारके, संग्रहालय आणि बीबी का मकबरा, औरंगाबाद, अजिंठा, एलोरा आणि पितळकोरा लेणी, सिद्धार्थ उद्यान या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांनी कोरोनाची पाहिली लस तरी घेतलेली पाहिजे, जर लस घेतलेली असेल तरच औरंगाबादच्या पर्यटनस्थळाची सैर करता येणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मागील आठवड्यात काढले होते. कोरोनाचा संसर्ग जरी कमी झाला असला तरीही कोरोना गेलेला नाही. त्यामुळे सर्व काळजी घेऊन पर्यटनस्थळे उघडण्यात आलेली आहे. आणि लसीकरण झाले असेल तरच एन्ट्री दिल्यामुळे लसीकरणालाही याद्वारे चालना मिळू शकेल.

जून महिन्यापासून औरंगाबादमध्ये पर्यटणासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढत आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत देशातील ६४ हजार ६०६ पर्यटकांनी आणि विदेशातील ४४ पर्यटनप्रेमिनी, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील १ लाख आणि विदेशातील १९० पर्यटकांनी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली. गेल्या पाच महिन्यात अजिंठा लेणी, औरंगाबाद लेणी, दौलताबाद किल्ला, बीबी का मकबरा, वेरूळ लेणीला आतापर्यंत ४लाख २४ हजार ६०४ भारतीय पर्यटकांनी आणि 484 विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. या पर्यटनस्थळापैकी पर्यटकांचा सर्वात जास्त कल बीबी का मकबऱ्याकडे दिसला. दिवाळीच्या आठ दिवसांच्या सुटीमध्ये ८२ हजार ५८६ आणि १९० विदेशी पर्यटकांनी येथे भेट दिली. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात असलेलं चित्र आता बदलल्यामुळे समाधानी वाटत आहे.

कोरोना महामारीमुळे बंद असलेली पर्यटनस्थळे जूनमध्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणाऱ्या पाच ऐतिहासिक स्मारकात तिकीट आकारले जाते. त्या आकडेवारीनुसार मागील महिन्यात तब्बल १. २० लाख पर्यटक आले. बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि वेरूळ लेणीला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *