भारतात होणाऱ्या विदेशी गुंतवणूकीपैकी ३०% गुंतवणूक आपल्या राज्यात.- ना. सुभाष देसाई
२० मार्च २०२० नंतर कोरोनच्या आजाराला रोखण्यासाठी संपुर्ण भारतात ताळेबंद करण्यात आली, यामुळे सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच आपण सर्वांनीच पाहिलं, त्याचबरोबर महाराष्टात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होऊन चार सहा झाले होते त्यातही आर्थिक स्तिथी चांगली ठेवण्याची जवाबदारी त्यांच्यावर होती आपल्या राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत …!
देशाचा विचार केला तर महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात कुठपर्यंत आहे.?
आपलं राज्य नेहमी प्रमाणे प्रमाणे आघाडीवर आहे, गेल्या दीड वर्षापासून आपण कोरोनाच्या संकटात आहोत, परंतु महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे, कोरोनाच्या काळात देखील आपण उद्योग चालू ठेवले. कारण देशात टाळेबंदी अचानकपणे झाली. आपण उद्योग चालू ठेवण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे यावर सूचना केल्या, आणि उद्योग सुरु राहील याची काळजी घेतली. त्यामुळे आपल्या राज्याच अर्थचक्र स्थिर आहे.
औरंगाबादमध्ये ऑरिक सिटी आहे त्यावर देशभरातील तज्ज्ञांनी जाणकारांनी पाहून समाधान व्यक्त केलं, संपूर्ण देशात हे एकमेव क्षेत्र आहे, नागपूरच्या मिहानया प्रकल्पाच देखील काम प्रगती पथावर आहे. तसेच रायगड येथे बल्ग ड्रग पार्क सुरु करणार आहोत. यासाठी केंद्र सरकार १ हजार कोटींचं अनुदान देत आहे, यामुळे औषध निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल आपण सध्या आयात करत असतो त्याची गरज भासणार नाही. आणि आपल्या औषधीसाठी देशांत लागणार कच्चा माल तयार होईल, त्यामुळे ब्लग ड्रॅग पार्क हा महत्वाचा प्रकल्प असेल.
तळेगाव येथे आपण इलेक्ट्रॉनिक पार्क सुरू करणार आहोत. सध्या आपला इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करण्यात आपण खूप पैसे खर्च करत असतो, इंधनांनंतर आयात कशाची होत असेल तर ती इलेक्ट्रॉनिक वस्तू ची होते आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यास इलेक्ट्रॉनिक वस्तूची आयात देखील कमी होणार आहे.
आपल्या राज्यात दरवर्षी दहा लाख विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तीर्ण होऊन बाहेर पडतात. यामुळे सुशिक्षित मनुष्यबळ आपल्यासाठी जमेची बाजू आहे, याचा फायदा राज्यातील उद्योग क्षेत्राला चांगला होत असतो विदेशी गुंतवणूक भारतात होते त्यातील ३० टक्के विदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आहे. महत्वाचं म्हणजे कोरोना नंतरच्या काळात विदेशी गुंतवणूक वाढली आहे. जवळपास ६० विदेशी कंपनी सोबत गुंतवणूक करार झाले आहेत, हे सगळे करार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित मध्ये झाले. हे सर्व उद्योग अमेरिका, इंग्लंड, जपान, जर्मनी, दक्षिण कोरिया आणि सिंगापूर अश्या देशातून होणार आहे. आपल्याकडे गुंतवणूकिमध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होत असते यात कुठे खंड पडलेला नाही.
अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
आपल्याकडे तीन मेगा फूड प्लांट तयार झाले आहे, वर्धा, पैठण आणि सातारा याव्यतिरिक्त शेतीवर आधारीत उद्योग वाढीला लागावे यासाठी बिडकीन येथे डी एम आय सी मध्ये फूड पार्क तयार करणार आहोत त्यामध्ये मराठवाड्यातील शेती उत्पादन आहे, सोयाबीन, मका यातून त्याच मूल्यवर्धन होईल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळेल. ही मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल.
आम्ही विद्यापीठ देखील संलग्न करत आहोत तरुण उद्योजकाना मार्गदर्शन करून त्यांच्या उद्योगाला विकसित करण्यासाठी लागणाऱ्या काही सुविधा आम्ही एमआयडीसी तर्फे देत आहोत.
महाविकास आघाडीचे काही दिवसात दोनवर्षे पूर्ण होईल, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहोत, तिन्ही पक्ष अत्यंत समांज्यस्याने काम करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामे करतांना नैसर्गिक संपत्तीची हानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी असे आदेश दिले आहेत त्यामुळे आम्ही कुठलाही उद्योग किंवा प्लांट उभा करत असताना जंगल तोड होणार नाही याची काळजी घेत असतो.
मी ठाकरे कुटुंबियांच्या तीन पिढ्यासोबत काम केलं आहे, समाजसेवेची परंपरा प्रबोधनकार ठाकरे यांच्या पासून आहे, बाळासाहेबांनी देखील समाजसुधारणेचे व्रत घेतलं आणि तेच कार्य आता उद्धव ठाकरे करीत आहे.
संत गाडगे बाबांनी सांगितल्या प्रमाणे धर्म म्हणजे काय
तहानलेल्याला पाणी द्या, भुकेल्याला अन्न द्या बेघर असलेल्याला घर द्या हेच आमचं काम आहे. ते काम या तिन्ही पिढ्या करत आहेत.
असे the reporter साठी दिलेल्या मुलाखती दरम्यान सुभाष देसाई यांनी सांगितले.