प्रतिभावान बखरकार – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, काल संध्याकाळी यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. वयाच्या शतक वर्षात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आयुष्यभर शिवचरित्राचा प्रचार प्रसार करून छत्रपतींचे जीवन चरित्र घराघरात- मराठी मनामनात पोहोचवणारे, बा. मो. उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांच्या आयुष्याचा क्षण न क्षण छत्रपती शिवरायांसाठी होता. ते स्वतः इतिहास चं एक सुवर्ण पान ! शब्द थांबले, वाणी स्तब्ध झाली , ते नमो चंडमुंड भंडासुर खंडिणी दुर्गे म्हणून होणारा आदिशक्ती चा जागर थांबला, आयुष्यभर शिवचरित्राची महापुजा मांडणारे शिवसाधक, शिवशाहीर, जाणता राजा सारखी एकमेवाद्वितीय कलाकृती घडविणारे प्रतिभावान सरस्वतीपुत्र, आपल्या लेखनातून, वाणीतून शिवकालीन इतिहास जिवंत करणारे पुरंदरे यांचे जाणे अवघ्या मराठी जनांसाठी एक दुःखद घटना आहे. या थोर शिवशाहिराला भावपूर्ण श्रद्धांजली !