दादर रेल्वे स्थानकावर मृतदेह बॅगेत सापडल्याप्रकरणी मोठा खुलासा, बायकोला अटक.
महाराष्ट्र क्राईम न्यूज : मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर बॅगेत मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत अर्शद अली शेखच्या बायकोला अटक केली आहे. अर्शदची पत्नी रुक्सानाचा या हत्येमध्ये सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर पायधुनी पोलिसांनी तिला अटक केली.
मृताची बायको रुक्सना हिचे नवराचा मित्र आणि आरोपी जय चावडा याच्यासोबत प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले. मुंबईतील पायधुनी परिसरात आरोपी जय चावडा याने अर्शदला दारू पिण्यासाठी बोलावून त्याचा मित्र शिवजीत सिंगच्या मदतीने त्याची हत्या केली.
नागपंचमीच्या दिवशी पोळी बनवू नका, नाही तर राहू-केतू आणि सर्प दोष…
हातोड्याने त्याची निर्घृण हत्या केल्यानंतर, मृतदेह पिशवीत भरून तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या बेतात असताना जयने दादर रेल्वे स्थानकावर पकडले. हत्येदरम्यान बेल्जियमच्या एका नंबरवरून एका अनोळखी व्यक्तीला व्हिडिओ कॉल करण्यात आला असून, ही व्यक्ती कोण आहे आणि त्याचा या सगळ्याशी काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
याआधी सोमवारी (५ ऑगस्ट) रेल्वे पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावर एका पिशवीतून मृतदेह बाहेर काढला होता. रेल्वे सुरक्षा दलाने तपास केला असता हा मृतदेह अर्शद अली नावाच्या व्यक्तीचा असल्याचे आढळून आले. यानंतर बॅग घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव जय प्रवीण चावडा आणि त्याचा साथीदार शिवजित सुरेंद्र सिंग असे होते.
‘लाडका मुख्यमंत्री सुद्धा आलं पाहिजे’ – बच्चू कडू
दोन्ही आरोपींना ऐकू येत नाही, बोलता येत नाही, त्यामुळे पोलिसांना आरोपींना सत्य उघड करण्यासाठी सांकेतिक भाषेतील तज्ञाची मदत घ्यावी लागली, त्यानंतरच हत्येचे कारण स्पष्ट झाले. यानंतर आता पायधुनी पोलिसांनी मृताची बायको रुक्साना हिला अटक केली आहे.
Latest: