दर्जा वाढवणारे नवीन शैक्षणीक धोरण आणणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
दर्जा वाढवणारे नवीन शैक्षणीक धोरण आणणार
– उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुलखत The Reporter या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू झालेल्या चॅनेल वर घेण्यात आली. काय आहे महाराष्ट्र राज्यातील न्यू एज्युकेशन पॉलीसी! तब्बल दीड वर्ष उलटून गेलं तरी महाविद्यालय पूर्ण क्षमतेने चालू झालेले नाहीत, याचा होणारा परिणाम, उच्च तंत्रशिक्षण घेऊन देखील तरुण बेरोजगार आहे यावर शासन नेमकं काय करतंय या सर्व प्रश्नाची उत्तरं उदय सामंत यांनी दिली.
सुरूवात करतानाच सामंत यांनी सांगितले. ” गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे, याच कालावधीत मी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून काम करतोय,सामाजिक किंवा राजकीय परिस्थिती एक वेगळ्या टप्प्यावर येऊन थांबली आहे, अशा प्रतिकुल परिस्थितीचा बोध घेऊन काहीतर चांगलं करण्यासाठी पुढे जायला हवं” हे सांगताना सामंत यांनी माहियी दिली की, राज्य सरकार डॉ. माशेलकरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टाचे नवे शैक्षणीक धोरण कसे असावे यावर सध्या कांम करत आहे.
राजकारण बिघडले
आपल्या महाराष्ट्राला स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. यशवंतराव चव्हाण , वसंतदादा पाटील या दिग्गज नेत्याचा वारसा आहे, त्यांनी केलेल राजकारण आणि आता सध्या चालू असलेलं राजकारण यात बराच फरक आहे. त्यावेळी देखील टीका व्हायची पण वैव्यक्तिक पातळीवर उतरून बदनाम करणं हे चित्र त्यावेळी नव्हतंच.
राजकीय स्पीड ब्रेकर म्हणजे काय तर विकासाकामामध्ये अडथळा आणणे, एखाद्या प्रसीद्धीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीला बदनाम करणं, महाविकास आघाडीच सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. कितीही स्पीड ब्रेकर आली तरी आम्ही पुढे जाणार आहे.
दोन अडीच वर्षांपूर्वी ही संस्कृती आली. जेव्हा आमचा मित्र पक्ष सत्तेपासून दूर गेला, उद्धव ठाकरे ज्यावेळी पक्षप्रमुख म्हणून काम करीत होते, तेव्हा सगळ्यांना लागत होते. परंतु जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते कुणालाच नको आहे. मी कधी कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. मी कोकणातील असलो तरी त्यांची जागा मी त्यांना निवडणुकीतून दाखवून दिली आहे. असा टोला देखील त्यांनी मुलाखती दरम्यान राणेंना लगावला.
ऑनलाईन शिक्षणाची अपरिहार्यता
ऑनलाइन शिक्षण घेणे आमच्या विभागाची हौस नव्हती. दिड वर्षांपूर्वी कोव्हिडंची एण्ट्री झाली आणि सर्व मनसुबे धुळीला मिळाले. ज्या पद्धतीने आम्हाला काम करायचं होत, यामुळे करू शकलो नाही.
आम्हाला विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळायचं होत म्हणून ऑनलाइन वर्ग चालू ठेवले आणि परीक्षा देखील ऑनलाइन घेतली. त्याचबरोबर कोरोनच्या काळात विद्यार्थी पास झालेले असले तरी त्यांना रोजगार असेल किंवा पुढील शिक्षण त्यांना नाकारलं जाणार नाही.
जर विद्यार्थी केवळ कोरोनाच्या काळात पास म्हणून नाकारले अशी तक्रार जर आमच्याकडे आली तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू अशा स्पष्ट सूचना आम्ही दिल्या आहेत.
दीड वर्षांपासून शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत, विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची मानसिकता होणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही महाविद्यालय आणि शाळा दिवाळी आधीच चालू करण्याचा निर्णय घेतला.
सेंटर ऑफ एक्सलन्सी
त्याचबरोबर राज्यात सेंटर ऑफ इक्सलान्स सुरू करणार आहोत, स्थानिक विभागाचा अभ्यास करूनत्याभागतील तरुणांना रोजगार मिळायला हवा, यावर निगडित कोर्सेस घेण्याचा मानस आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, मालवण ,रायगड, अहमदनगर मध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहोत.
महाविद्यालयीन निवडणुका
विद्यापीठ आणि महाविद्यालयात निवडणूक घेणं यात वेगवेगळे पैलू आहेत, त्यात निवडणूक घेतली की गुन्हे वाढतात असे काही जण म्हणतात पण दुसरीकडे नवीन नेतृत्व तयार होते आणि सुशिक्षित तरुण राजकीय प्रवाहात येतात. यामुळे यावर आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या सोबत चर्चा चालू आहेत, योग्य वेळी निर्णय घेऊ असे उदय सामंत यांनी सांगितले. लवकरच निवडणूका घेण्याचा निर्णय होईल अशी अपेक्षा तरुणांना आहे.
कोकण- कोल्हेकुई बाधक नाही
कोकणातील राजकीय परिस्थिती बाबत उदय सामंत यांनी अगदी संयमाने उत्तर दिलं, सध्या कोकणात वातावरण शांत आहे, आणि ते पुढे देखील कायम राहील. चिंपी विमानतळाचे श्रेय हे सिंधुदुर्ग वासीयांचे आहे, ज्या लोकानी विमानतळासाठी जागा दिल्या त्यांच आहे.
आम्ही जनतेशी बांधील आहोत, कुणाला काय श्रेय घ्यायचं आहे त्यांनी घ्यावं, काही दिवसांपूर्वी विमानतळ परिसरात कोल्हा आला त्याच श्रेय पण घ्यायला हवं. या चिंपी विमानतळाच्या श्रेय वादावरून नारायण राणे यांच्यावर नाव न घेता उदय सामंत यांनी टीका केली.
शिक्षण – उद्योग मंत्रालय समन्वयातून नवी वाट
राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि मी चर्चा करून राज्यातील तंत्रशिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात रोजगार कसा मिळवून देता येईल यावर निर्णय घेऊ.
शिक्षणानंतर तरुणाला नोकरी मिळावी आणि आपण बाहेरच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जातो परंतु परदेशातील तरुणांनी आपल्या राज्यात शिक्षण घेण्यासाठी यावं. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही कांम करत आहोत.