शिवसेनाला औरंगाबादेत विकासाचा झेंडा लावण्याची गरज..
शिवसेनाला औरंगाबादेत विकासाचा झेंडा लावण्याची गरज..
औरंगाबाद शहरात वीस वर्षांपासून सामान्य नागरिकाचे प्रश्न कायम आहेत, यावर कायमचा उपाय म्हणून काही ठोस पावलं उचलल्याचा भास होतोय. आज शहराची धुरा प्रशाकीय अधिकारी आस्तिक कुमार पांडे याच्या हातात असली तरी याआधी महानगर पालिकेवर शिवसेनेची भाजपबरोबर युती आणि युतीचीच सत्ता होती. रस्ते, पाणी, कचरा, वाढत धुळीचं प्रमाण यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्याचे कधी दिसलेच नाही.
यंदा शिवसेना ध्वज दिवाळी अभियान राबवत आहे, यात शहरातील ५० हजार घरावर भगवा ध्वज लावूंन दिवाळी साजरी करणार आहे, पण या संकल्पातून नेमकं काय साध्य करणार आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ? त्यात नको तिथे खर्च या धोरणावर स्मार्ट शहराचे काम चालू आहे असे नागरिक आणि स्थानिक पक्ष पदाधिकारीही चर्चा करतात. यावर अजूनही प्रशासनाचे स्पष्टीकरण नाही.
त्यात गुंठेवारी आणि लेबर कॉलोनीच्या विषयावर नागरिक आणि विरोधक एकवटले आहेत, यामुळे शिवसेनेने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारी ठेवायला हवी त्याच बरोबर शहरात दोन विधानसभा सदस्य आणि एक विधान परिषदेचे सदस्य शिवसेने चे आहेत ,त्यामळे त्यांनी कर्तृत्त्वाचे आणि विकासाचे झेंडे लावणे अपेक्षित आहे.