१५ तास वेब ब्राउजिंग बॅटरी क्षमतेचा नोकियाचा पहिला अँड्रॉइड टॅबलेट भारतात
१५ तास वेब ब्राउजिंग बॅटरी क्षमतेचा
नोकियाचा पहिला अँड्रॉइड टॅबलेट भारतात
नोकियाचा पहिला अँड्रॉइड टॅबलेट भारतात लॉन्च झाला आहे. HMD ग्लोबल कडून या नोकिया T20 टॅबलेट ला लॉन्च करण्यात आले. त्याचबरोबर नोकियाच्या या पहिल्या वहिल्या टॅबलेट सोबत 2k डिस्प्ले आणि 8200mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. ही बॅटरी 15 तास वेब ब्राऊझिंद करू शकते. असं या कंपनीचे मत आहे.
येणाऱ्या काळात अजून बरेच प्रॉडक्ट भारतात लॉन्च होणार असून बऱ्याच कंपन्या देखील भारतात येणार आहेत.
यामध्ये दोन वायफाय आणि एका सिमकार्डची सुविधा असणार आहे. त्याचबरोबर स्टीरियो स्पीकर सोबत आपल्या अनोख्या टॅब्लेटसाठी तीन वर्षाची सिक्युरिटी सुद्धा देण्यात आली आहे.या वायफाय टॅबलेट मध्ये 3GB रॅम आणि 32 GB स्टोरेज आणि एका वायफायच्या टॅबलेट मध्ये 4GB रॅम आणि 32GB स्टोरेजही मिळणार आहे. आणि 4G मॉडेलसाठी ग्राहकांना 18,499 भरावे लागणार आहे. 2 नोव्हेंबर पासून हा टॅबलेट बाजारात उपलब्ध होणार असून nokia.com या वेबसाईट वरून आणि फ्लिपकार्ड वरून खरेदी करण्यात येणार आहे.
या टॅबलेटमध्ये 10.4 इंच 2k म्हणजेच 2000×1200 पिक्सेल चे डिस्प्ले दिलेले असून ब्राईटनेस 400 निट्स एवढे असणार आहे. या टॅबलेट मध्ये ऑक्टा-कोर Unisoc T610 चा प्रोसेसर, 4GB रॅम, सेल्फी कॅमेरा दिला आहे. पण सेल्फी कॅमेरा कमी असून 5 मेगापिक्सलचा देण्यात आला असून रिअर कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा आणि सोबतच फोटो चांगले यावे यासाठी LED फ्लॅश आणि डबल मायक्रोफोन, स्टीरियो स्पीकर देण्यात आलाय.
ग्राहकांना 32 GB आणि 64 GB अशा दोन प्रकारच्या स्टोरेजची सुविधा मिळणार असून 512GB पर्यंत मायक्रो SD कार्ड लावता येऊ शकतो. आणि कनेक्टिविटीसाठी 4G, वायफाय 802.11ac, ब्लूटूथ, USB Type-C तसेच 3.5mm ऑडिओ जॅक, 8200mAh ची बॅटरी देण्यात आली असून चार्ज साठी 15W चे फास्ट चार्जर देण्यात आले आहे.