मनोरंजन

सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी बरोबर सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची महत्त्वाची बैठक संपन्न

Share Now

मुंबईत एक ऑगस्ट रोजी सह्याद्री विश्रामगृहवर सांस्कृतिक राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची एक महत्त्वाची बैठक भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत पत्रकारांच्या बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मागण्यांविषयी चर्चा झाली असून पत्रकारांना आधीस्वीकृती पत्र, त्यांना सांस्कृतिक समितीमध्ये सहभाग, सांस्कृतिक आणि इतर कार्यक्रमांमध्ये सरकारतर्फे आमंत्रण, पत्रकारांना घरासाठी विशेष कोटा,.इतर अनेक मागण्या होत्या.

या’ चुकीमुळे गॅरंटीशिवाय मिळणार नाही कर्ज, जाणून घ्या मुद्रा योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी


कार्यक्रमात अनेक सिने पत्रकार आणि चॅनलचे प्रतिनिधी,आणि माध्यम रंगकर्मी उपस्थित होते.
या बैठकीचे आयोजन भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी तर्फे करण्यात आले.
विजय हरगुडे ( अध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा ), हेनल मेहता (सह प्रभारी चित्रपट आघाडी ) समीर दीक्षित अध्यक्ष (भाजपा चित्रपट आघाडी ) राकेश ठाकूर सरचिटणीस चित्रपट आघाडी यांच्या उपस्तितीत कार्यक्रम पार पडला.
विजय हरगुडे यांनी व्यक्तिशः पाठपुरावा करायचे ठरवून पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करण्याकरता मंत्री महोदय बरोबर चर्चा करतील असे सांगितले.

9वी ते 11वीचे गुण जोडून काढणार 12वीचा निकाल?, जाणून घ्या, विद्यार्थ्यांवर काय होईल परीणाम

समीर दीक्षित म्हणाले – गेल्या दहा वर्षापासून सिने पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांची बैठक झालेली नव्हती आणि मुनगंटीवार यांनी या प्रश्नांकडे व्यक्तिगत नोंद घेऊन लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे भाजपा चित्रपट आघाडीला कळविले आहे.सर्व पत्रकार आणि माध्यम रंगकर्मी यांनी भाजपा चित्रपट आघाडीचे विशेष आभार मानले असून चित्रपट आघाडीला संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *