शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या हस्ते आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडला, या कार्यक्रमास केंद्रीय कायदे व न्याय मंत्री किरण रिजिजू सर्वोच न्यायालयाचे न्यायाधीश एन . व्ही. रमण्णा,केंद्रीय मंत्री भागवत कराड या कार्यक्रमास उपस्थित होते.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये परंतु या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलोय, न्यायदान हि न्यायालयाची जवाबदारी नसून आपली सर्वांची जवाबदारी आहे. तसेच कार्यकारी यंत्रणा, न्यायपालिका, कायदे मंडळ आणि प्रसिद्धी माध्यमे या चार स्तंभावर लोकशाहीचा स्तंभ आज उभा आहे. आज देखील पोलीस स्टेशनची संख्या कमी आहे तसेच पोलीस कॉटर्स देखील उभारण्याचा शासनाचा मानस आहे. महिलांवरील अत्याचार वाढत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यावर उपाय म्हणून ज्या महिला बेघर आहेत त्यांना सुरक्षित निवास मिळवा, यासाठी मुंबईमध्ये आम्ही सुरवात केली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती संपुष्ठात यावी असा समाज आपल्याला घडवायचा आहे, यासाठी सामान्य जनतेला विधी तज्ज्ञानी पुढाकार घेऊन आपल्या राज्यघटनेबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे. आपल्याला स्वतंत्र मिळून ७५ वर्ष होत आहेत, म्हणून अमृत महोत्सव साजरी करीत आहोत परंतु आपल्याला अमृत मंथांचाही गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्राच्या दरम्यान बोलले. केंद्र सरकारला जितके अधिकार आहेत तितकेच अधिकार राज्याला आहेत, हे अधिकार संविधानाने दिले आहेत. केंद्र सरकारवर अशी टीका देखील त्यांनी केली.
या खंडपीठाला ४० वर्ष पूर्ण झाले आहेत. १९८१ मध्ये या खंडपीठाची स्थापला झाली, त्यावेळी मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश व्यंकटराव देशपांडे, तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुलेमहाराष्ट्राचे कायदे मंत्री शिवाजीराव पा. निलंगेकर याच्या योगदानातून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची स्थापना झाली आहे. या नवीन इमारतींमुळे खंडपीठात कोर्ट हॉलची संख्या वाढणार आहे,या नवीन इमारतीमध्ये ए, बी, आणि सी अश्या तीन विंग असून त्यातील बी आणि सी विंगच्या इमारतीचा उदघाटन सोहळा पार पडला. तर ए विंगचे काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणार आहे.
picCourtesy : instagram: Ambadas Danve Official Profile