प्राध्यापक शिंदे प्रकरणाचा अखेर उलगडा लागला!
औरंगाबाद शहरात प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांचा खून करण्यात आला होता. औरंगाबादच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची खळबळ उडाली होती. गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या प्रकरणाचा तपास आता लागला असून पुरावे शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. सलग सातव्या दिवशी मारेकऱ्याने ज्या शस्त्राने खून केला आहे ते शस्त्र पोलिसांच्या हाती लागले आहे. हा खून प्राध्यापक शिंदे यांच्याच अल्पवयिन मुलाने केला आहे. हा मुलगा विधिसंघर्षग्रस्त बालक असून त्याला विधिसंघर्षग्रस्त विभागाच्या हवाली देण्यात आले आहे. मयत प्राध्यापक शिंदे आणि विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्यात सतत मतभेद सुरु असायचे. करिअर च्या बाबतीत असेल किंवा शिक्षणाच्या बाबतीत या बालकाचे विचार शिंदे यांना पटत नव्हते.
खून झाल्यापासून ते आतापर्यंत काय घडलं?
मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकवत असलेले प्राध्यापक डॉ राजन शिंदे यांचा राहत्या घरी एन 2 सिडको येथे खून करण्यात आला होता. प्राध्यापक शिंदे यांचा खून झाला त्या दिवशी रात्रीच्या वेळी विधिसंघर्षग्रस्त बालक आणि शिंदे यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर मृत शिंदे हॉल मध्ये झोपले आणि आई मुलगी बेड रूम मध्ये टीव्ही बघत होती. आणि मुलगा मर्डर मिस्त्री बघत बसला होता. त्यानंतर सर्वजण झोपले की नाही याची तपासणी केल्यानंतर थंड डोक्याने रात्री 2-3 वाजेच्या सुमारास वडील गाढ झोपेत असताना विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या डोक्यात डंबेलने सलग 5 वेळेस वार केले. त्यानंतर शिंदे यांच्या हाताच्या नसा आणि गळा कापण्यात आला. मयत प्राध्यापक शिंदे आणि विधिसंघर्षग्रस्त बालक यांच्यात सतत मतभेद सुरु असायचे. हा खून त्यानेच केल्याचं अगोदरच त्या बालकाने कबूल केले होते. परंतु पुराव्या अभावी अटक करण्यात आली नव्हती.
या खुना नंतर मंगळवारी प्राध्यापक शिंदे यांच्या शरीराचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले होते. या पोस्टमॉर्टेम रिपोर्ट मधून खून किती क्रूरपणे करण्यात आला होता , हे उघड झाले होते. खुणात वापरण्यात आलेली सर्व शस्त्र कोठे लपवण्यात आले आहे. याचा तपास केल्यानंतर शिंदे यांच्या घरापासून थोडं लांब असलेल्या मैदानात काहीतरी पुरले असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तपासात बोबडी वळलेल्या निकटवर्तीयाकडून पुरावे सापडावे म्हणून पैसेही फेकले पण तो जागच्याजागीच स्तब्ध झाला होता. त्यानंतर सर्व शस्त्रे घरा जवळ असलेल्या विहिरीत फेकल्याचं या बालकाकडून स्पष्ट झालं होतं.
परंतु अनेक वर्षांपासून ही विहीर पडीक असल्याने त्यात मोठ्या प्रमाणावर कचरा जमा झाला असल्यामुळे त्यात गॅसही असण्याची शक्यता होती. शनिवार 16 ऑक्टोबरला या विहिरीतील पाणी उपसा करण्यात आला होता. महापालिकेच्या मदतीने पाच एचपीचे दोन आणि दोन एचपीचे दोन अशा चार पंपांद्वारे पाणी उपसण्याचे काम सकाळपर्यंत सुरु होते. यात आणखी एक मोटार वाढवण्यात आली आहे. यासाठी आठ ते दहा कर्मचारी काम करत होते. संपूर्ण पाणी उपसल्यावर शस्त्र सापडतील की नाही हा प्रश्न सर्वांना पडला होता. आज अखेर या विहिरीतून शस्त्रे बाहेर काढण्यास, पुरावा मिळण्यास आणि मारेकऱ्याला शोधण्यास पोलिसांना यश आले.
मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी मृत प्राध्यापक डॉ राजन शिंदे यांच्या पत्नीच्या फिर्यादी वरून कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे होता. त्याच्या मदतीसाठी बऱ्याच अधिकाऱ्यांची टीम बनवण्यात आली. यात टेक्निकल ऍनालिसिस करण्यासाठी सायबर क्राईमचे पीआय गौतम पातारे, पीआय गीता पालवडे, लोकल पोलीस स्टेशनचे पीआय गिरी, क्राईम ब्रांचचे एपीआय शिंदे एपीआय जाणवाल, पीएसआय शेळके, महिला पीएसआय गुळवे, बचाटे, महिला एपीआय वायदंडे, अजून बऱ्याच सहकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती. या खुणात अजून कोणाचा सहभाग होता का याचा तपास पोलीस करत आहे.
‘या प्रकरणातील आरोपी हा विधिसंघर्षग्रस्त बालक असून त्याच्या संदर्भात मिळालेले पुरावे तपासून, त्याचा या खुना प्रकरणी हात आहे की नाही याचा सोक्ष मोक्ष लावून त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यानंतर विचारपूस केली असता हा गुन्हा केल्या असल्याची कबुली त्याने दिली आहे. आणि खून करताना वापरण्यात आलेली हत्यारे आम्हाला सापडली असून पुढील तपास चालू आहे.’ असं उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितलं.