“one day without internet” सांगत आहेत मिताली
एक प्रवास जो फायनान्स पासून सुरु झाला पण पुढे वळण घेत आता सायकॉलॉजी पर्यंत पोहोचला.
“इफ वी चेंज द वर्ल्ड विल चेंज” अस म्हणणाऱ्या मिताली लाठी यांची मुलाखत.
फायनान्स पासून ते मानशास्त्रा पर्यन्त हा प्रवास कसा झाला ?
– “माझे वडील ,भाऊ ,बहीण यांचा अकॅडेमिक ग्राफ हा अगदी लहानपणा पासूनच वरचा ! मी मात्र कधी लक्षच दिलं नाही. वडील चार्टड अकाउंटंट, म्हणून मी पण तिकडे वळले. पण जे क्षेत्र आपल्याला आवडत नाही त्याच्यात बऱ्याचदा अपयश येतं , मला पण या क्षेत्रात अपयश आलं. नंतर लग्न झालं, माझे पती सायंटिस्ट, त्यांनी सजेशन दिलं आणि परत एकदा चुकले, कारण मी काय करू शकते, माझ्यातील क्षमता फक्त मीच जाणू शकते .. साहजिकच अपयश आलं. तिसऱ्यांदा मात्र मी विदेशात गेले आणि काही घडामोडींमुळे मला जाणवलं की, आपल्याला लहानपणापासूनच लोकांना ऑब्जर्व्ह करायला, व्यक्तिमत्त्व जाणून घ्यायला आवडतं. जेव्हा मी या विषयी वाचणं चालूं केल तेव्हा मला वाटलं की बस! हेच ते क्षेत्र आहे. जे आपल्याला आवडतंय. समोरच्या व्यक्तीला समजून घेणं, त्याची शिकण्याची पद्धत, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी हे जाणून घेण्याची उत्सुकता अगदी तेव्हापासून सुरू झाली आणि तेव्हा पासून मी हे काम करतेय.
युवापिढीवर करिअरचे प्रेशर असते, दबाव असतो . त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
– नॅशनल क्राईम रिपोर्ट नुसार दर तासाला आत्महत्या होते. क्षेत्र निवडले जाते आणि तेच माझ्यासाठी आहे ही धारणा बळावते. काही दिवसांपूर्वी एक एमबीबीएसच्या प्रवेशासाठी पूर्वपरीक्षेची तयारी करीत असलेली विद्यार्थिनीनी एमबीबीएस म्हणजेच आयुष्य आहे अशी धारणा तिने बनवली आणि त्यामुळे तिचे शेवटचे 15 दिवस परीक्षेचे खराब गेले आणि त्यामुळे ती परीक्षा व्यवस्थित नाही देऊ शकली नंतर डिप्रेशन मध्ये गेली . हे जे काही झालंय ना ते थांबलं पाहिजे, अशा चुकीच्या धारणा थांबवल्या पाहिजेत. यातून मनावर प्रचंड ताण येतो आणि हा मार्ग हेच आपले करिअर वाटू लागतं. जे की व्हायला नको.
मी पालकांना सांगू इच्छिते, की लहानपणा पासून मुलाची इतरांशी तुलना करू नका, एज्युकेशन आधीच खूप कम्पिटेटीव्ह आहे आणि वरून जर प्रेशर वाढत गेलं तर मुलांना सक्सेस म्हणजेच लाईफ असं वाटू लागलं आहे तर प्रेशर वाढून आत्महत्या होतात. अशा आत्महत्या कमी करायच्या आहेत तर मुक्त संवाद होणं गरजेचं आहे, विचारांना समजून घेणं गरजेचं आहे. आत्महत्येचे विचार येत असतील तर आपल्या जवळच्या माणसाशी संवाद साधा.
कोरोना काळात गॅजेट्सचं प्रमाण वाढत आहे हा चिंतेचा विषय आहे तुम्हाला काय वाटतं पालकांनी आणि मुलांनी काय करावं ?
– लॉकडाऊन पासून सगळं ऑनलाईन सुरु आहे त्यामुळे गॅजेट्स आज तरी आपण आयुष्यातून बाजूला करू शकत नाही. म्हणून स्क्रीन हँडलिंग साठी मानसिक चेतना अनुषंगाने परिवर्तन हा प्रोजेक्ट चालू आहे. ज्यामध्ये टिप्स काही सांगता . सर्वात पहिले अवेअरनेस गरजेचा ! याचे परिणाम काय होतील. वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर ५ वर्षां पर्यंतच्या मुलांच्या स्कल चं साइझ हाफ एमएम साइझ आहे, १ एमएम साइझ १० वर्षापर्यंतच्या मुलांचा तर अडल्ट चं साइझ २ एमएम पर्यंत आहे. तर रेडिएशन मुले लहान मुलांवर परिणाम जास्त होतो. इंटरनेटवर असताना नॉन स्टॉपिंग कन्टेन्ट मिळतो, त्यामुळे मुलं सतत अशा गॅजेट्सला चिकटून असतात. त्यासाठी वेगळी पद्धत वापरावी लागेल जसं मैदानी खेळ खेळणं, एक्सरसाइज किंवा छोटे छोटे साइन बोर्ड ज्यात लिहिलं असेल कि “आय एम स्मार्टर देन स्मार्ट” स्क्रीन फास्टिंग डे सेलिब्रेट करा. वायफाय म्हणजेच without इंटरनेट फॅमिली डे, नो फोन झोन अशे स्लोगन्स लावा.
१९९७ नंतर ची जी मुलं आहेत त्यांना आपण टेकनॉलॉजी पासून वेगळं नाही करू शकत.
तुम्ही राहता गुजरातला आणि फाउंडेशनचं काम करण्यासाठी इथे येता हे कसं जमतं ? आणि फॅमिली कशी सपोर्ट करते?
– मागच्या २०१७ पासून कॉन्स्टंट ट्रॅव्हल करतीये अहमदाबादवरून, फॅमिली सपोर्ट शिवाय हे पॉसिबल नाही आणि फॅमिली मुक्त विचारांना वाव देणारी आहे. माहेर आणि सासरी या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांची आवड असल्यामुळे मला हे काम करता येतंय, प्रवास करता येतोय.