क्राईम बिट

मुंबई विमानतळावर अधिकाऱ्यांनी कागद आणि मेणात लपवलेले १३ किलो सोने केले जप्त, ७ जणांना झाली अटक.

Share Now

मुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई सुरूच आहे येथे सीमाशुल्क विभागाने गेल्या पाच दिवसात 24 प्रकरणांमध्ये 13.24 किलो सोने, 10.33 कोटी रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि 45 लाख रुपयाचे विदेशी चलन जप्त केले आहे. यासोबतच सात प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान ही जप्ती केली.

अजित पवारांचे डॅमेज कंट्रोल, आज भाजपची बैठक होणार, उद्धव गटाने बनवली ही रणनीती

एजन्सीच्या म्हणण्यानुसार अटक करण्यात आलेल्यापैकी पाच भारतीय आहेत. यातील दोन नागरिक दुबईचे होते, तर दोन नागरिक अबुधाबी आणि एक जेद्दाहून आले होते. या लोकांकडे सोन्याचे दागिने सापडले, ज्यांचे एकूण वजन 4,850 ग्रॅम आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, या लोकांनी कपड्यामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये लपवून ठेवलेले सोने आणले होते. अवैधरित्या सोने आणल्याप्रकरणी सात जणाना अटक करण्यात आली आहे
.
याशिवाय उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील दोन लोकांना सीआयएसएफने पकडून एआययूच्या ताब्यात दिले. या लोकांकडून दोन पिशव्या सापडल्या असून त्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची पावडर मेणात लपवली होती. त्याचे वजन 1,950 ग्रॅम होते. एका प्रकरणात, फ्लाइटच्या झडतीदरम्यान, विमानाच्या टॉयलेटमध्ये नळाजवळ तीन बॅगा आढळल्या. यामध्ये सोन्याची पावडर मेणात लपवण्यात आली होती. त्याचे वजन 3,199 ग्रॅम होते. सोन्याची किंमत तात्पुरती 1,89,79,976 रुपये आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठल रुख्मिणीला खास पोशाख, सुनबाई वृषाली शिंदे पंढरपुरात आल्या

बैंकॉकला जाणाऱ्या दोन परदेशी नागरिकांना 7,300 युरो, 2,500 यूएस डॉलर, 29,000 पाउंड स्टर्लिंग आणि 12,000 न्यूझीलंड डॉलर्स, एकूण 44,76,380 रुपयांचे विदेशी चलन पकडण्यात आले.सीमाशुल्क अधिकात्याने सांगितले की, हे चलन त्याच्या लॅपटॉपच्या बॅगमध्ये विशेष डब्यात लपवले होते. याशिवाय 16 भारतीय नागरिक, त्यापैकी 12 अबुधाबी, 2 दुबई, 1 बहरीन आणि एक शारजाह येथून 3,431 ग्रॅम सोने आणि 2,16,34,655 रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सापडल्या

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *