ओटीटी प्लॅटफॉर्मवर “तिची” चलती बोल्ड न ब्युटीफूल .. कुल !
आजकाल प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य देतात. मागील दोन वर्षात या प्लॅटफॉर्मवरील वेबसिरीजमध्ये बरेच स्त्री मुख्य पात्र लोकांना बघायला मिळाले.
स्त्रिया विविधांगी भूमिका रेखाटताना दिसतात. ग्लॅमर आणि सोबत चौफेर अभिनय करत या माध्यमात स्त्री कलाकारांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलंय.
तर बघुयात प्रभावित करणाऱ्या काही मुख्य स्त्री भूमिका –
Aarya -हॉटस्टारवरील २०२० मध्ये रिलीज झालेली आर्या वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यात सुष्मिता सेनने आर्या हे प्रमुख पात्र साकारले होते.आर्या एक गृहिणी असून ती आपल्या कुटुंबासोबत खूप खुश असते एक दिवस अशी एक घटना घडते की तिला तिच्या कुटुंबाचे एका मोठ्या ड्रग गँगपासून संरक्षण करावे लागते. आर्याला तिच्या कुटुंबाबद्दल गूढ गुपिते कळतात.जेवढी ती ड्रग गँग पासून सुटका करण्याचा प्रयत्न करते तेवढीच ती त्या जाळ्यात अधिक फसत जाते. आर्याचा एक आई ते माफिया क्वीन पर्यंतचा प्रवास थरारक आहे.आर्या या वेब सिरीजमध्ये आर्या या कॅरेक्टरचे अनेक शेड्स दिसतात. सुष्मिता सेनचे हे कमबॅक असूनही हे कॅरेक्टर तिने उत्तम साकारले आहे.
Delhi Crime – दिल्ली गॅंग रेप २०१२ वर आधारित असलेली नेटफ्लिक्सवरील दिल्ली क्राईम या वेब सिरीजमध्ये डीसीपी वर्तिका चतुर्वेदी हे लीड कॅरेक्टर आहे.अभिनेत्री शेफाली शहाने हे पात्र साकारले आहे. वर्तिका चतुर्वेदीच्या दृष्टिकोनातून दिल्ली क्राईम या सिरीजची स्टोरी सांगितली गेली आहे.२०१२ भयानक गॅंग रेप डीसीपी वर्तिका चतुर्वेदी इन्वेस्टीगेट करते. .शिस्तबद्ध आणि गंभीर स्वभावाची ही भूमिका. वर्तिका चतुर्वेदीचे कॅरेक्टर एक छाप पाडून जाते.
CodeM- या Zee 5 वरील वेब सिरिजच्या कथेमध्ये दोन आतंकवादी आणि एका मिलिटरी ऑफिसरचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू होतो.या केसचा तपास मिलिटरी वकील मोनिका मेहरा करते. तपासात मोनिका मेहराला लक्षात येते की एन्काऊंटर केस जसा दिसतो तसा नसून गुंतागुंतीचा आहे..मोनिका मेहरा ही कोणताही मेलोड्रामा न करणारी स्ट्रेटफॉरवर्ड स्वभावाची वकील आहे. जेनिफर विंगेटने पहिल्यांदाच ott प्लॅटफॉर्ममध्ये काम केले आहे. जेनिफर विंगेट च्या ॲक्शन सीन्स एकदम खरे वाटतात. आर्मीवर आधारित असलेल्या वेब सिरीज आणि चित्रपटात बर्याच महिला भूमिका प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत.पण लीड कॅरेक्टर मध्ये एक महिला मिलिटरी वकील असणे दुर्मिळ आहे.
The Family man season 1 &2 – The Family man मध्ये मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत. ऍमेझॉन प्राईमवरील फॅमिली मॅन चे दोन्ही सीजन खूप लोकप्रिय आहेत. यात मनोज बाजपाई सारखा सर्वोत्तम अभिनेता असूनही अभिनेत्रीने प्रियामणीने साकारलेली सूची तिवारी प्रेक्षकांच्या लक्षात राहते. मुख्य स्त्री पात्र हे बहुतेक वेळा सकारात्मकच असते. मुख्य स्त्री पात्राला एक आदर्श स्त्री दाखवण्याचाच फिल्म मेकर्सचा हेतू असतो.सूची तिवारी हे ग्रे शेड पात्र आहे म्हणजेच काही प्रमाणात ते नकारात्मक पात्र आहे.सूची तिवारी ही एक अबला नारी नसून तिच्या इच्छेनुसार ती तिचे आयुष्य जगते. प्रेक्षकांनी या पात्रावर बरीच टीका केली होती.