जगाला झाकून टाकणारा भारतीय वस्त्र उद्योग!
भारतातले जितके म्हणून मोठे कॉर्पोरेट हाऊस आहेत. टाटा,बिरला, अंबानी अशा सगळ्या उद्योगांची सुरुवात किंवा ओरिजिन ही टेक्सटाईल म्हणजे कपड्याच्या धंद्या पासून झाली.या भारतातल्या कपड्याच्या उद्योगाचा इतिहास ब्रिटिश काळापासूनच जगभर प्रसिद्ध आहे, त्याच्यातला “कॅलिको” हा कापडाची भारतातून अवघ्या जगभर मागणी वाढली. कॅलिको म्हणजे सुती कापड.
१७५० नंतर भारतीय टेक्सटाईल म्हणजे कापडी उद्योग आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडा मध्ये प्रसिद्ध झाला. युरोपियन लोकांनी भारतीय बाजारपेठेचा शोध घेत इथे पॉल ठेवले आणि बघता बघता मोठ्या प्रमाणात माल घेऊन जाऊ लागले.पोर्तुगीस पहिले स्पाइस ट्रेडर होते ज्यांनी सुती कापडाचा शोध घेता-घेता भारताच्या दक्षिणेतील बंदर “कालिकत ” ला आले आणि त्या कापडाला नाव देण्यात आल “कॅलिको”. पुढच्या काही दशकांमध्ये पूर्ण सुती कपड्याचा नाव पडलं कॅलिको ! कॅलिको ची मागणी बघता बघता इतकी वाढली कि लोक लंडन मधल्या फॅब्रिकला सुद्धा कॅलिको म्हणू लागले.
मागणी इथेच नाही थांबली, तर भारतात बनलेल्या “मस्लिन ” चा दणका टेक्सटाईल मार्केट मध्ये गाजू लागला. त्यानंतर कोणताही कापड जो मऊ,बारीक विणलेलं असेल त्या प्रत्येक कापडाला मस्लिन अस सम्बोधण्यात आलं. त्यानंतर सूतिकापडावर फुलाच्या प्रिंट असलेल्या कापडाला “चिंत्झ “नाव देण्यात आलं तर कोणत्याही गडद रंगाच्या रूमलाला “बांधना”नाव दिल.
हळू हळू भारतातल्या या कापडाचे वर्चस्व इतके वाढायला लागले की इंग्लंड च्या राणीने स्वतः कॉटन चे कपडे घातले. यूरोपीय ट्रेडर्स कासीम बाजार, पाटणा,कलकत्ता, ओरिसा मधून कापड विकत घेऊ लागले. भारताच्या वाढत्या वर्चस्वामुळे युरोप चा वस्त्र उद्योग डगमगला आणि फक्त कॅलिको ची मागणी वाढत गेली. याला मोठा अटकाव वेगवेगळ्या माध्यमातून घातला गेला. विणकर हे भारतीय वस्त्र उद्योगाचा आत्मा आहेत आणि त्यांच्या कलेला आजही तेवढेच मोल असायला पाहिजे जेवढे ते प्राचीन काळी होते.. वस्त्रांवर नक्षीकाम हे भारतीय वस्त्रोद्योगाला एक महत्त्वाचा पैलू आहे जो आजही जगभरात आपली जर टिकवून आहे. कलाकुसर अबाधित राहिली तर याची ख्याती कायम राहील.