काय ? ब्रेस्ट टॅक्स ?
आपण घराचा कर भरतो, जमिनीचा कर देतो , इनकम टॅक्स भरतो, gst भरतो पण कधी ऐकलं? स्तन झाकायला कर द्यावं लागतो ?
होय। स्तन म्हणजे ब्रेस्ट झाकायला कर द्यावं लागायचं आणि ही गोष्ट कुठली दुसऱ्या देशातली नाही तर भरतातलीच आहे.
१९व्या शतकात केरळच्या त्रावणकोर मध्ये खालच्या जातीच्या स्त्रियांना कंबरेच्या वरचा भाग उघड ठेवावं लागत असे, म्हणजे स्तन झाकण्याची परवानगी नव्हती. स्तन झाकल्यास त्यांना ब्रेस्ट टॅक्स म्हणजे कर द्यावा लागत होता. हा कर वसुलण्यासाठी राजाचे सैनिक प्रत्येक दारात जाऊन, स्तनाच्या आकारानुसार कर वसुली करत होते. याला ‘मुलाकारम” असं पण म्हणत होते.
या सगळ्यांचा विरोध करताना नांगेली नावाच्या महिलेने आपलं स्तन झाकून या प्रथेचा विरोध केला. या ‘बोल्ड’ निर्णयामुळे नांगेली आणि तिच्या पतीला कर मागण्यात आल. कर घेण्यासाठी जेव्हा सैनिक तिच्या दारावर पोहोचले तेव्हा नांगेली ने तिचे स्तन कापले, काही वेळा नंतर तिचा मृत्यू झाला.या निर्णयात तिचा साथ देणाऱ्या पतीने तिच्या चितेवर उडी मारून जीव दिलं या सोबतच कोणत्या पुरुष सतीची ही पहिली घटना होती. बघता बघता ब्रेस्ट टॅक्स विरोधात आंदोलनं वाढायला लागली. आणि शेवटी त्रावणकोर च्या राजाला घोषणा करावी लागली की स्त्रिया कंबरेवरचा भाग झाकू शकतात.
नांगेलीच्या बलिदानामुळे कायदा बदलण्यात आला, इतकंच नाही तर केरळ मध्ये सुद्धा स्त्रियांना आंगवस्त्र किंवा ब्लाउज घालायच्या स्वतंत्रतेसाठी जवळ पास ५० वर्ष संघर्ष करावा लागला. आजही जरी असे काही नियम कायदे नाहीत तरी सुद्धा समाजात परिस्थिती काहीशी बदललेली नाही, आजही दररोज कितीतरी स्त्रिया कोणत्या ना कोणत्या कारणांनी समाजात स्वतःच्या हक्कांसाठी लढत आहेत.