काँग्रेस नेत्याची बोचरी टीका, मुख्यमंत्री सिरीअस नाही, कट करणे त्यांच्यासाठी गौरव, अभिमान
मुख्यमंत्री सिरीयस माणूस अजिबात नाही. आपली खुर्ची वाचवणे, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याची बोचरी टीका नाना पटोले यांनी केली. मुंबईमध्ये झालेली हिट अँड रनची घटना भयावह, अशी घटना आहे. या घटनेमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाने महिलेला चिडून टाकले. महाराष्ट्राच्या विकासाची गती थांबविण्यासारख्या या घटना आहेत. या सरकारला सत्तेचा माज आल्याची घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिट अँड रन प्रकरणावरून तसेच राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरून हल्लाबोल केला. पटोले म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते आम्ही त्यांना पाठिशी घालणार नाही. मात्र, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सिरीयस माणूस अजिबात नाही. आपली खुर्ची वाचवणे, भ्रष्टाचार आणि कटकारस्थान निर्माण करणे हे त्यांच्यासाठी गौरव आणि अभिमानाचा असल्याची बोचरी पटोले यांनी केली.
समृद्धी महामार्गावरून केली टीका
ते म्हणाले की, समृद्धी महामार्ग भंडारापर्यंत घेऊन जात आहेत. मात्र, त्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे. महागाई निर्माण करण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले. चुकीच्या माणसाच्या हातामध्ये सरकार आहे. सरकार जे सांगेल तेच अधिकारी काम करत असल्याचे पटोले म्हणाले. लाडकी बहीण योजनेवरूनही नाना पटोले यांनी टीकास्त्र सोडले. लाडकी बहीण योजना वाचवेल, असे त्यांना वाटतं. मात्र हे मिथक आहे. सर्व भगिनी त्रासल्या आहेत. सरकार गाजर दाखवत असून त्यांना माहीत असल्याचे ते म्हणाले. या योजनेचा कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
सहा मजली इमारत कोसळून 15 जण गंभीर तर 5 जण अडकल्याची भीती
कोणत्या विभागातील अधिकारी सुरक्षित आहे हाच प्रश्न
नाशिकमधील झालेल्या घटनेवरून सुद्धा पटोले यांनी टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की कोणत्या विभागातील अधिकारी सुरक्षित आहे हाच प्रश्न आहे. एक्साईजच्या अधिकाऱ्यांना मारले जात आहे, अशा घटना रोजच घडत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या पैसे घेऊन करण्याने याचा परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर होत आहे अशी टीका त्यांनी केली.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..
फडणवीस राजा हरिश्चंद्र आहेत
पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खोचक टीका केली. त्यांनी सांगितले की, आपल्याबद्दल ते नॅरेटिव्ह तयार स्वत: ते करत असेल तर काय, ज्यांनी खोटे बोलून सत्ता घेतली तो खोटे नॅरेटिव्हबद्दल बोलत असेल तर काय? अशी विचारणा त्यांनी केली. फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी खोटे नॅरेटिव्ह पसरवलं. फडणवीसच याचे मास्टरमाईंड आहेत. विधानपरिषद निवडणुकीत चुकीचा नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असेही त्यांनी सांगितले.
Latest: