चिमुरडा दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडून गंभीर जखमी
नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे धक्कादायक घटना घडली . दोन वर्षांचा चिमुरडा दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून थेट खाली पडला. हा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. दोन वर्षांचा करिम शेख सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत खेळत होता. त्यावेळी अचानक काहीतरी पडल्याचा आवाज झाला.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..
दोन वर्षांचा करिम शेख सकाळी 9 वाजेच्या सुमारास गॅलरीत खेळत होता. त्यावेळी अचानक काहीतरी पडल्याचा आवाज झाला. त्याचवेळी समोरच्या घरातील व्यक्ती बाहेर आली. तेव्हा मुलगा खाली पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यात तो गंभीर जखमी झाला. करिम खाली पडल्याचे समजताच तात्काळ शेजारी गोळा झाले. त्यांनी मुलाच्या कुटुंबियांना कळवले. यानंतर त्या मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये सुरुवात नोकरीची, त्वरित अर्ज करा
नशीब बलवत्तर म्हणून चिमुकला बचावला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.करिम गॅलरीतून खाली पडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. काळे मळा येथे सिडकोत योजनेतील इमारतीमध्ये शेख कुटुंबीय राहते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास करीम हा खेळत होता. त्यावेळी करिमची आई कपडे धुत होती. करिम गॅलरीत खेळता खेळता रिलींगवर पकडून उभा होता. त्यानंतर अचानक करिमचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्याहून थेट खाली पडला. शेख यांच्या घरासमोर राहणाऱ्या कुटुंबाच्या निदर्शनास ही घटना आली. त्यांनी करिमला तात्काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. सध्या करिमवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अंबड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद केल्याची माहिती आहे.
Latest: