महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
पुण्यात धक्कादायक घटना घडली. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केल्याची घटना पुण्यात घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. तर, पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान बुधवार चौकात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी संजय फकीरा साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकात वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे वाहनातील एकाने संबंधित महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले.
फूड सेफ्टी अथॉरिटीमध्ये सुरुवात नोकरीची, त्वरित अर्ज करा
महिला अधिकाऱ्याला पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने त्याच्या हातातील लायटर पेटू न शकल्याने पुढील दुर्घटना टळली. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली तर, पुण्यातून गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटना वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेत चक्क पोलिस अधिकाऱ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुन्हा कायदा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरेंनी डिवचलं,शिंदेंनी सुनावलं ..
शुक्रवारी संध्याकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यानची ही घटना पुण्यातील मध्यवर्ती भागातील बुधवार चौकात ही घडली. वाहतूक नियमन करत असताना एक महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांनी एका संशयित वाहनाला रोखले. त्यावरून वाहन चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद सुरू असताना कारमधून एकजण उतरला आणि त्याने महिला पोलिस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकले.
पेट्रोल टाकल्यानंतर त्याने त्यांना पेटवून देण्याच्या उद्देशाने लायटर काढले. मात्र ते लायटर पेटू न शकल्याने त्याने लायटर उलटे पकडल्त्यामुळे या दोघांचेही जीव वाचले. या प्रकरणी दोन संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Latest: