बिझनेस

ऑनलाइन शॉपिंगची वाढती मस्ती बाजारपेठांना मात्र धास्ती !

Share Now

ऑनलाइन शॉपिंगचं वाढतं प्रमाण, त्यात घरपोच डिलिव्हरी आणि भरमसाठ ऑफर्स यामुळे प्रत्यक्ष बाजारपेठेत वसलेल्या व्यापाऱ्यांना मात्र धास्ती बसली आहे, वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दुकान थाटलेल्यांचा थाट कमी होताना दिसतोय. कारण ग्राहकांचा कल ऑनलाईन शॉपिंग कडे चांगलाच वाढलाय. शिवाय यासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाल्याने चॉईस करायला वाव आहे आणि wow म्हणण्याची संधी सुद्धा !

जीवनावश्यक कोणतीही वस्तू सहज घरपोच मिळत असल्याने ऑनलाइन शॉपिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, मिनत्रा असे अनेक ऑनलाइन शॉपिंग अँप सध्या भारतात उपलब्ध आहेत. लाखोंनी ग्राहक याकडे वळला आहे. एक तर घर बसल्या पाहिजे ते उत्पादन बघता येतं, त्यातही मूल्य लगेच समजतं वर एखादी ऑफर देखील असते. यामुळेच भारतीय ग्राहकही मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शॉपिंग करतोय.
आकडे बोलतात :
एसोचम च्या सर्व्हेक्षण नुसार २०१७ मध्ये १०८ दशलक्ष ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंग ला पसंती दिली तर २०१७ मध्ये लोकप्रिय श्रेणीमध्ये जास्त ग्राहक खर्च ऑनलाइन केला गेला. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची खरेदी ३३ टक्के केली असून कपडे आणि इतर ५४ टक्के. त्याचं बरोबर सौन्दर्य प्रसाधन ४३ च्या वर खरेदी केली आहेत.
वर्षाकाठी काही काळ वाढीसाठी खूप मोठा वाव आहे. लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा आणि अधिकाधिक डिलिव्हरी चॅनल्समुळे, ऑनलाइन खरेदी वाढणे बंधनकारक आहे. यात आश्चर्य नाही, एक मोठी रक्कम परदेशी गुंतवणूक या क्षेत्रात येत आहे. हा एक अब्ज अब्ज गुंतवणुकीचा व्यवसाय बनला आहे. बॅक एंड डिलीव्हरी चॅनेल, ब्रँड बिल्डिंग, ग्राहक संशोधन आणि बिल्डिंग ट्रेड पार्टनरमध्ये गुंतवणूक ही मुख्य कारक ठरेल, असे एसोचॅमचे सरचिटणीस श्री डी एस रावत म्हणाले.
पेमेंट मोडचे ऑप्शन्स :
हे सर्वच व्यवहार नियमित इंटरनेट वापरकर्त्यांसाठी – कॅश ऑन डिलिव्हरी ही पेमेंटची सर्वात पसंतीची पद्धत होती (७४%), त्यानंतर डेबिट कार्ड (१८%) आणि क्रेडिट कार्ड (५%). या पर्यायांमुळे साहजिकच ग्राहक सुखावला आहे. अनेकदा कॅश बॅकही मिळते. यामुळे टी वस्तू आणखी स्वस्त दरात पदरात पडते. या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष बाजारावर झाला जिथे व्यापारी दालन सुरु करून स्टॉक भरून बसले आहेत. दुसरीकडे ग्राहकांची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचेही दिसून येते. याचा सर्वाधिक फटका कपडा आणि इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेला बसला आहे. अनेक प्लॅटफॉर्म वर बाय बॅक सुविधा, एक्स्चेंज ऑफर असल्याने आणखी मोठ्या प्रमाणात ग्राहक तिकडे आकर्षित होताना दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *