महाराष्ट्रातला समृद्धी देणारा स्व. बाळासाहेब ठाकरे महामार्ग
समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणीस सरकारच्या काळातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिला जातो. या महामार्गासाठी जवळपास पन्नास हजार कोटी रुपये इतका खर्च सरकार करणार आहे. मुंबई ते नागपूर असा महामार्ग असणार आहे, सध्या मुंबईहून नागपूर जाण्यासाठी १४ तास इतका वेळ लागतो तसेच ८१२ किलोमीटर अंतर आहे. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई हून नागपूर जाण्यास आठ तास इतका वेळ लागेल तर ११२ किलोमीटर अंतर देखील कमी होणार आहे. राज्यातील एकूण १२ जिल्हे जोडणारा हा महामार्ग भविष्यात राज्याच्या उद्योग-व्यवसायालाही गती देणारा ठरेल. विशेषतः योग्य नियोजन झाले तर कृषी क्षेत्राला या महामार्गाचा अधिक फायदा होऊ शकतो.
या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही असणार आहेत, महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे, यामुळं हा महामार्ग ग्रीनफिल्ड करण्यासाठी वृक्ष लागवड होईल. २० कृषी समृद्धी केंद्र या मार्गानजीक असतील ज्यामुळे शेतकरी- ग्राहक जोडले जातील.या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम. एस. आर. डी. सी) पूर्ण करणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारने या महामार्ग चे नामकरण करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केला या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेव ठाकरे समृद्धी महामार्ग असे नामकरण केले.
इतके जिल्हे जोडणार
हा महामार्ग एकूण १२ जिल्ह्यांना जोडत हा मार्ग जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर आणि नाशिक या समावेश यात आहे , त्याच बरोबर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, आणि पालघर या शहरांना देखील जलद वाहतुकीसाठी या महामार्गाचा लाभ होईल.
औरंगाबादला लाभ लॉटरी
मराठवाड्यातील पहिला टनेल हा औरंगाबाद येथील पळशी येथून जाणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद हे या महामार्गाचे केंद्रबिंदू असणार आहे, याचा फायदा औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच जालना येथे इंडस्ट्री हब व करमाड लॉजीस्टिक हब आणि दौलताबाद येथे टुरिझम हब उभारणार आहेत. यामुळे दळण-वळणासाठी हा मार्ग सोयीस्कर ठरेल.
टोल कसा असेल ?
या महामार्गावर टोल वसुली कशी असेल हा प्रश्न सर्वांना पडलला असेल ? ही टोल वसुली किलोमीटर प्रमाणे असेल ज्या शहरातून आपण ज्या शहरातून महामार्गावर लागणार आहोत किंवा ज्या शहरात आपण थांबणार आहोत त्या प्रमाणात टोल आकारणी होईल. तोल किती असेल हे मात्र अजून ठरले नाही. तरी या महामार्गावरून प्रवास करणे फार महाग नसेल हे नक्की. कारण या रस्त्यावरून होणारी वाहतूक ही सुकर आणि जलद असेल. शिवाय रस्ता दर्जेदार बांधण्याची हमी घेतली गेली आहे. मात्र जंक्शन पॉईंट्स किंवा या महामार्गावर येण्यासाठी वळण रस्ते काही गावांना -शहरांना लांब असतील हे लक्षात ठेवलेले बरे.