देश

छत्तीसगडमध्ये तयार होतंय भारतातील सगळ्यात मोठं मानवनिर्मित जंगल!

Share Now

छत्तीसगडमध्ये सध्या भारतातील सगळ्यात मोठे मानवनिर्मित जंगल तयार करण्यात येणार आहे. रायपूरपासून ५५ कि. मी. दूर असलेल्या दुर्ग जिल्ह्यातील नंदिनीमध्ये एक बंद खाण आहे या भागात हे जंगल विकसित करण्यात येणार आहे. सध्या सुरु असलेल्या उपक्रमात ३७०० एकर वर पसरलेल्या खाणींमध्ये असलेल्या जागेचे मोठ्या जंगलात रूपांतर होईल. आतापर्यंत ११२० एकर जागेचे जंगलात रूपांतर करण्यात आले आहे.

२०२१ मध्ये ३० वेगवेगळ्या प्रजातीचे जवळपास ८३ हजार रोपे स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत राज्य वन विभागाकडून लावण्यात आले आहे,यामध्ये औषधी वनस्पतींचा देखील समावेश आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३.३७ कोटी रुपये आहे. मियावाकी या जपानी पद्धतीच्या संकल्पनेचा वापर करून हे काम हाती घेण्यात आले आहे. ज्यामध्ये झाडे घनदाट आणि १० पट गतीने वाढतात. नंदिनी जंगलाचे काम पूर्ण झाल्यावर ते भारतातील सर्वात मोठे मानवनिर्मित जंगल असेल.

नंदिनी जंगलामध्ये पाण्याचा प्रचंड साठे तयार करण्यात आले आहे. स्थलांतरित परदेशी पक्षी येथे आढळले. सूत्रांनी सांगितले की, पुढील दोन वर्षात हा प्रकल्प व्यापक आकार घेण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्ये अश्या बऱ्याच बंद पडलेल्या खाणी आहेत.भविष्यात नंदिनी जंगलात ईको – इथनिक टुरिझम विकसित होणार आहे. यात लँडस्केपिंग, वॉटर स्पोर्टसला प्रोत्साहन राहण्यासाठी कॉटेजचा समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *