धर्म

आषाढी एकादशी निमित्त शहरात तीन दिवस दुमदुमला विठ्ठलाचा गजर

Share Now

२८ जून रोजी देवगिरी संगीत प्रतिष्ठान आयोजित भानुदास चव्हाण या नाट्यगृहात झालेल्या नृत्यरंग या कार्यक्रमात देवमुद्रा अ मूव्हमेंट स्कूल संस्थेतर्फे संत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर आधारित विठ्ठल तुकयाचा ही नृत्यनाटिका सादर करण्यात आली.या कार्यक्रमाची संकल्पना, दिग्दर्शन आणि निवेदन हे रामदास पवार यांची होती.

Tata Motors ने दिला झटका, 17 जुलैपासून नवीन कार घेणे महागणार

तुकाराम महाराजांच्या अभंगांचे नृत्य दिग्दर्शन व्हीं सौम्याश्री यांचे आहे. अभांगांवर भरतनाट्यम ह्या शास्त्रीय नृत्य शैलीवर सादर करण्याची संकल्पना पहिल्यांदाच बघायला मिळते. या नृत्य नाटिके मध्ये व्हि सौम्याश्री यांनी तुकारामाची भुमिका आणि साक्षात विठ्ठलाची भुमिका ही प्रेरणा नायडू हिने साकारली.

CUET UG Answer key 2023: मदत, फी न घेता CUET UG उत्तर की वर आक्षेप नोंदवू शकतो

त्यांच्यासोबत वारकऱ्यांच्या भूमिकेत ईशिता कुलकर्णी ,ईशानी कुलकर्णी,
सायली सराफजोशी, सुहासिनी पठारे,सई घाडगे रामपल्लेवार, मनाली सुधाळकर, सायली वाते
आश्लेषा मगरे, ज्ञानदा साबदे, शितल जैस्वाल,
सागर कारके, संदीप दौंड हे होते. विठ्ठलाची रंग भूषा आणि वेशभूषा ही भाग्यश्री कुलकर्णी यांनी केली होता.
२९ जून रोजी पुन्हा हाच कार्यक्रम प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक संस्था, सिडको गीता भवन येथे आणि २ जुलै रोजी मातोश्री वृद्धाश्रम येथे सादर करण्यात आला.

काय वाटतं सांगा comments मध्ये!..#maharashtrapolitics #ajitpawar

या कार्यक्रमासाठी हजर असलेल्या प्रत्येकाने प्रत्यक्षात विठ्ठलाचे दर्शन घेऊन वारीला गेल्याचा अनुभव घेतला.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *