PM मोदींनी 71 हजार तरुणांना दिली नियुक्तीपत्रे, या खात्यांमध्ये मिळाल्या नोकऱ्या
16 मे रोजी पंतप्रधान मोदींनी रोजगार मेळाव्याद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये निवडलेल्या 71,000 तरुणांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नियुक्ती पत्र दिले. यासोबतच पंतप्रधानांनी निवडक तरुणांनाही संबोधित केले. देशातील 22 राज्यांमध्ये रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले होते. केंद्र सरकारने या मेळाव्याचे आयोजन केले होते.
क्रॅनबेरी महिलांना UTI समस्येपासून दूर ठेवेल…
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे, हे लक्षात घेऊन या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. आज 16 मे रोजी पाचव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 22 राज्यांमधील 45 केंद्रांवर रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. युवकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, रोजगार मेळावा हा युवकांना सशक्त करण्याचा आणि राष्ट्रीय विकासात त्यांचा सहभाग मजबूत करण्याचा प्रयत्न आहे.
माजी अग्निवीरांना रेल्वे भरतीतही मिळणार आरक्षण, जाणून घ्या कोणत्या पदावर किती?
या 71 हजार निवडक तरुणांना ग्रामीण डाक सेवक, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल-कम-तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक-सह-टंकलेखक, कनिष्ठ लेखा लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी अशा विविध पदांवर नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर सहाय्यक कुलसचिव आणि सहाय्यक प्राध्यापकांसह अनेक विविध पदांचाही समावेश आहे.
तुमचं लक्ष बारामतीत जास्त असल्याने…
आतापर्यंत किती तरुणांना रोजगार मिळाला?
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत ३ लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळाला आहे. यापूर्वी आयोजित रोजगार मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी ७१ हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली होती. 22 ऑक्टोबर 2022 रोजी पहिला रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. केंद्र सरकारकडून आतापर्यंत एकूण 5 रोजगार मेळावे यशस्वीपणे आयोजित करण्यात आले आहेत.
Latest: