चक्क! पोलीस भरती साठी डॉक्टर, इंजिनीअर, law चे विद्यार्थी!
औरंगाबाद ग्रामीण पोलिसांत हवालदार पदांची भरती सुरू झाली आहे. शारीरिक चाचण्यांना बसलेल्या उमेदवारांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, बीई, बीटेक, एम.फार्म आणि इतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. एकूण 39 पदांसाठी 5,725 अर्ज प्राप्त झाले होते. भरती प्रक्रियेच्या पहिल्या तीन दिवसांत, 2,100 उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, त्यापैकी 1,102 उमेदवार उपस्थित होते आणि 907 चाचणीसाठी पात्र ठरले होते, आणि 195 अपात्र ठरले होते.
चंद्रकांत पाटलानं माझा सगळीकडे तमाशा केला – निर्मला यादव
एसपी मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, 10 पीआय, 9 एपीआय, 17 पीएसआय आणि 135 कॉन्स्टेबल ही भरती प्रक्रिया राबवत आहेत. तसेच 18 व्हिडीओग्राफर तैनात करण्यात आले असून संपूर्ण मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 12वी उत्तीर्ण असली तरी. BHMS मध्ये MD पूर्ण केलेला उमेदवार दिसला. याशिवाय, 5 ME, 22 MBA, 27 M.Com, 30 M.Sc, 67 BE, 25 B.Tech, 14 B.Pharm, 2 LLB/LLM, 26 B.Sc Agri, 407 B.Sc, 205 BBA/ B.Sc पण झाले.