news

धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात, उपचारासाठी मुंबईला हलवणार

Share Now

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. काल रात्री परळीत ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात धनंजय मुंडे यांच्या छातीला मार लागला आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असली तरीही त्यांना मुंबईत पुढील उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली

अपघाताबद्दल अधिक माहिती अशी की, काल परळीतील आझाद चौकात रात्रीच्या वेळी ही घटना घडली. रात्री सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे स्वतः गाडी चालवत होते. अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. धनंजय मुंडे यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्यांच्या छातीला मार लागली आहे. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलवण्यात येणार आहे.

……………………………………………………..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *