पोलीस प्रशिक्षण केंद्रात इन्स्पेक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होतं ?
प्रवीण विश्वनाथ कदम यांच्या काही मित्रांना खोलीचा दरवाजा बंद असल्याचे दिसले त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांनी खिडकीतून डोकावले असता त्यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.
धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली. प्रवीण विश्वनाथ कदम असे मृताचे नाव आहे. मंगळवारी घटनेपूर्वी इन्स्पेक्टरने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते की, माझ्या आत्महत्येस मी स्वतः जबाबदार असून इतर कोणालाही दोषी धरु नये, गंगापूर पोलीस स्टेशन येथील फेटल गुन्हा त्यास कारणीभूत आहे, असं पीआय प्रवीण कदम यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा :- घरी बायकोसोबत भांडण, नशेत विचारले अश्लील प्रश्न ; आरोपी रिक्षा चालकाने दिली कबुली
दीक्षांत समारंभाच्या तयारीत भाग घेतला
अधिकारी पुढे म्हणाले की, 21 नोव्हेंबर रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवीण विश्वनाथ कदम यांनी मंगळवारी दुपारी या सोहळ्याच्या तयारीत सहभाग घेतला. वास्तविक, प्रवीण विश्वनाथ कदम हे पुण्याहून आल्यानंतर 2019 पासून धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होते. अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी संध्याकाळी जेव्हा त्याच्या काही मित्रांना खोलीचा दरवाजा बंद दिसला तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर मित्रांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता प्रवीण विश्वनाथ हा फासावर लटकलेला दिसले , त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती दिली. यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांना खोलीत प्रवीण विश्वनाथ कदम यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात त्यांनी लिहिले की, त्यांच्या मृत्यूसाठी कोणालाही दोष देऊ नये. नाशिकमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांना या घटनेची माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .