news

चिंतामुक्त अंत्यसंस्कारासाठी आता खासगी कंपनी स्थापन

Share Now

ठाणे : मूलबाळ नसलेली वृद्ध दाम्पत्य, परदेशात मुले-मुली असल्याने एकाकी असलेले वृद्ध आई-वडील, अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींना मृत्यूनंतर आपल्यावर विधिवत अंत्यसंस्कार कोण करणार, अशी चिंता मनोमन कुरतडते. मुंबईतील संजय रामगुडे यांना या चिंतेतच व्यवसायाची संधी दिसली.

त्यासाठी कंपनी स्थापन करून त्यांनी अशा निराधारांच्या अंत्यसंस्काराचे कंत्राट घ्यायला सुरुवात केली. आजवर पाच हजार व्यक्तींवर त्यांनी या पद्धतीने चिंतामुक्त अंत्यसंस्कारातून ५० लाखांची उलाढाल झाली असून, बदलत्या जीवनशैलीमुळे येत्या काळात ती २,००० कोटींवर जाईल, असा त्यांना विश्वास आहे.

अंत्यसंस्कार केले आहेत. या

मुंबईत रामगुडे यांच्या सुखांत मॅनेजमेंट प्रा.लि. कंपनीची मुख्य शाखा आहे. त्यांच्याकडे सुमारे २० कर्मचारी कार्यरत आहेत. रामगुडे कित्येक वर्षांपासून सिनेसृष्टीत निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून करतात. कार्यरत होते. ३० वर्षांपूर्वी वाराणसीत चित्रपटाच्या शूटिंगनिमित्ताने ते गेले असता, तेथील घाटावर सुरू असलेल्या मरणोत्तर विधींनी त्यांचे लक्ष वेधले. यातूनच कंपनी स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली.

हेही वाचा :- ४५ हजार कोटींची गुंतवणूक; १२ हजार लोकांना रोजगार

संपूर्ण देशात अशा प्रकारचे काम करणारी ही एकमेव कंपनी असल्याचा दावा ते निधनाची माहिती मिळाल्यावर अवघ्या एका तासात कंपनीची टीम तेथे पोहोचते. प्रत्येकाची इच्छा आणि परंपरा यानुसार अंत्यसंस्कार केले जातात. हा संपूर्ण व्यवसाय टॅक्स फ्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या आहेत सुविधा
– अंत्यसंस्काराचा व्हिडिओ घरपोच
– मृत्यू प्रमाणपत्र पाठवण्याची सुविधा, इच्छा असेल तेथे होणार अस्थी विसर्जन
– मरणोत्तर मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना दोन प्रकारच्या सेवा
– जर आधीच बुकिंग करून सर्व सुविधांसाठी मेंबर झालात, तर ३७,७०० रुपये खर्च येईल
– केवळ अंत्यसंस्कारासाठी टीम बोलावली, तर ८,५०० ते १२,५०० रुपये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *