अजिंठा लेणीच्या व्ह्यू पॉइंटवर नवा प्रकल्प
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या व्ह्यू पॉइंटवर नोव्हेंबरपासून ‘स्टार गेझिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एमटीडीसी’चे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यांनी दिली.
हा प्रकल्प समुदाय आधारित पर्यटन प्रकल्प असेल. यामध्ये आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांचे मूलभूत ज्ञान देण्याबरोबरच आकाशातले तारे न्याहाळण्याची संधी मिळणार आहे.
दुर्बिणीद्वारे तारे पाहता येतील. हिवाळ्यात आकाश निरभ्र असते. अंधार पडल्यानंतर दररोज संध्याकाळी पर्यटक आणि विविध ताऱ्यांची माहिती घेणाऱ्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल.
हेही वाचा: आ. संजय शिरसाट यांच्यावर अँजिओप्लास्टी
लेणी सौंदर्याचा मुकुटमणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरातून आता नभातील ताऱ्यांचे दर्शन रात्रीच्या वेळी घेता येणार आहे. प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, या प्रकल्पासाठी आवश्यक सविधा देण्यात येत आहेत.