कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात, एवढ्या दिवसाचा बोनस मिळणार
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या उत्पादकतेवर आधारित बोनस देण्यास मंजुरी दिली. याचा फायदा रेल्वेच्या ११.२७ लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना होणार आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, दरवर्षी दसरा पूजेच्या निमित्ताने रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकता बोनस दिला जातो. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी त्यांना ७८ दिवसांचा उत्पादकता आधारित बोनस दिला जाईल. या अंतर्गत पात्र रेल्वे कामगारांना ७८ दिवसांसाठी जास्तीत जास्त १७ हजार ९५० रुपये दिले जातील. याचा फायदा ट्रॅक देखभाल कर्मचारी, रेल्वे चालक, गार्ड, स्टेशन मास्तर, निरीक्षक, तंत्रज्ञ, तांत्रिक सहायक, पॉइंट्समन यांच्यासह ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांना होईल.
https://twitter.com/raosahebdanve/status/1580238246067703808?t=rjtDdGWce_J32Ugwld7CSg&s=19