संजय राऊतांचा ‘दसरा’ कारागृहातच, १० ऑक्टोबर पर्यंत कोठडीत वाढ
पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना दसराही तुरुंगातच घालवावा लागणार असून. संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली आहे. १० ऑक्टोबरलाच त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार अशी माहिती समोर येत आहे. गटप्रमुखांच्या मेळाव्यात संजय राऊत अनुपस्थित असल्याने त्यांचं नाव असलेली खुर्ची रिकामी ठेवण्यात अली होती. दसरा मेळाव्याच्या आधी संजय राऊत बाहेर येतील आणि तोफ धडाडेल अशी शिवसैनिकांनी अपेक्षा होती. मात्र कोठडीत वाढ झाली असल्याने शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात संजय राऊत नसणार.
DA नंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा आणखीन एक भत्ता वाढणार, लवकर मिळणार खुशखबर
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली. दरम्यान संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर २७ सप्टेंबरला सुनावणी पार पडली. मात्र, कोर्टाने संजय राऊत यांना दिलासा दिला नाही. कोर्टाने जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
पत्रा चाळ गैरव्यवहारात संजय राऊतांचा सहभाग
पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले आहे. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात राऊत यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.
दुष्काळग्रस्त भागात सेंद्रिय पद्धतीने पपईची लागवड करून या पठयाने शेतीचे चित्रच बदलले
आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केले. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, असेही ईडीने आरोपत्रात म्हटलं आहे.