महाराष्ट्र

सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव

Share Now

कोकणातील सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला संसदपटू म्हणून नावलौकिक मिळवलेले माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यात आले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवार, २७ सप्टेंबर रोजी झाला. कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणाऱ्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचे लोकार्पण ९ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते.

सरकारने 4% ने वाढवला DA, गरिबांना आणखी 3 महिने मिळेल मोफत धान्य, मंत्रिमंडळाने दिली मंजूरी

या विमानतळाला काय नाव द्यायचे यावरून वाद रंगला होता. सिंधुदुर्ग विमानतळ किंवा बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी झाली होती. अखेर काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले. उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) हा प्रकल्प हाती घेऊन विमानतळाचे काम पूर्ण केले आहे.

राज्यात पावसामुळे कापूस पिकाचे मोठं नुकसान,अतिवृष्टीमुळे 27 लाख शेतकरी संकटात

बॅ. नाथ पै उत्कृष्ट संसदपटू होते. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यांचा परराष्ट्र, अर्थ या विषयांवर दांडगा अभ्यास होता. १९७१ मध्ये त्यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. त्यांनी कोकणच्या विकासासाठी मोठे योगदान दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *