साधूंना मारहाण प्रकरणी सहाजण ताब्यात
सांगलीतील लवंगा गावात लहान मुलांना पळवणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून आणखी १० ते १२ आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
जागतिक स्थरावर दोन पदक मिळवणारी विनेश फोगट बनली पहिली भारतीय महिला
उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथून चार साधू कर्नाटक येथे देवदर्शनाला आले होते. तिकडून ते लवंगामार्गे विजापूर येथे जात होते. यावेळी त्यांनी रस्त्यात एका विद्यार्थिनीला विजापूरला जाणारा रस्ता हाच का अशी विचारणा केली. त्यावेळी ही मुळे पळवणारी टोळी असल्याच्या समजुतीने काही लोकांनी या साधूंना बेदम मारहाण केली. त्यांना गाडीतून खेचून काढत बेल्ट आणि काठीने मारहाण केली. यावेळी आपण साधू असल्याचे त्यांनी सांगूनही जमावाने त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही. शिवाय या साधुंनी ओळखपत्र आणि आधार कार्ड दाखवूनही जमावाने मारहाण सुरूच ठेवली. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने मारहाण थांबवण्यात आली.
लम्पी त्वचा रोग : मराठवाड्यात 197 गुरांना लागण, 43 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण
यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर १० ते १२ जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.