आजची सुनावणीने शिवसेनेला दिलासा? पहा काय म्हणाले सर्वोच्य न्यायालय
महाराष्ट्रातील राजकीय गोंधळ गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शिवसेनाचा सत्तासंघर्ष असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्या नंतर सुरू झालेला वाद. या सर्व घटनांचा राजकीय उलथापालथीवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय (SC) एकनाथ शिंदे, भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करणे, बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणे आणि धनुष्यबाण चिन्हाचा अधिकार यासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी करत आहे. काळ देखील सुनावणी झाली होती दरम्यान आजचा वेळ कोर्टाने घेतला होता.
काल झालेला युक्तिवाद व्हिडिओ स्वरूपात पहा
जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना पोलीस निरीक्षकाने केली दमदाटी, जंजाळांची पोलिसात धाव
आज देखील सर्वोच न्यायलयात सुनावणी झाली यात अनेक युक्तिवाद झाले त्यात. पक्षाच्या भूमिकेविरोधात मतदान केल्यास १०व्या परिशिष्टाचे उल्लंघन होते का? असा सवाल शिंदे गटाने उपस्थित केला. त्यावर सर न्यायधीश म्हणाले, मग पक्षाच्या व्हीपचा उपयोग काय?, आपण राजकीय पक्षाकडे दुर्लक्ष करु शकत नाही, हा लोकशाहीसाठी मोठा धोका ठरू शकतो असे सरन्यायाधीश म्हणाले.
कापसाच्या भावात घसरण, मात्र कापडाची महागाई जोरात, समजून घ्या येणाऱ्या काळात कापसाचे दर कसे असतील
गेलेले आमदार सदस्य नाही, आमच्या दृष्टीने ते अपात्र आहेत, संपूर्ण प्रकरण आमदारांच्या बहुमतांवर अवलंबून आहे, हे प्रकरण सामान्य नाही असे शिवसेनेचे वकील सिब्बल म्हणाले. प्रकरण पाच नायायाधीशांच्या खंड पीठाकडे जाणार आहे कि नाही यावर सोमवारी ८ तारखेला सुनावणी होईल, निवडणूक आयोगाला ठोस निर्णय न घेण्याची कोर्टाने सूचना दिली. यावरून शिवसेनाला दिलासा मिळेल का असा प्रश्न निर्माण होतो आहे.